5 Surprise picks in Team India vs West Indies: टीम इंडियामध्ये 'या' पाच खेळाडूंची झाली निवड; साऱ्यांनाच बसला आश्चर्याचा धक्का

विंडिजविरूद्धच्या वन डे आणि टी२० मालिकांसाठी भारतीय संघाची काल घोषणा करण्यात आली.

IND vs WI Team India Squad: विंडिजविरूद्धच्या वन डे आणि टी२० मालिकेसाठी भारताचा संघ बुधवारी जाहीर करण्यात आला. या संघात काही अशा खेळाडूंची निवड करण्यात आली ज्यामुळे अनेक चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला. पाहूया ते पाच खेळाडू...

कुलदीप यादव (Kuldeep Yadav)- बराच काळ भारतीय संघाबाहेर असणाऱ्या कुलदीपला अचानक वन डे संघात स्थान देण्यात आले. भारताचा दुसऱ्या फळीचा संघ श्रीलंकेत खेळायला गेला असताना कुलदीपने पाच सामन्यात केवळ सहा बळी घेतले होते. त्यानंतर त्याला संघात स्थान देण्यात आले नव्हते.

आवेश खान (Avesh Khan)- आवेश खानला दोन्ही संघात स्थान देण्यात आले आहे. न्यूझीलंडविरूद्ध त्याला टी२० संघात घेतलं होतं. पण वन डे साठी त्याची ही पदार्पणाची मालिका असणार आहे.

दीपक हुडा (Deepak Hooda) - दीपकला २०१७ आणि २०१८ दोन्ही वर्षी टी२० मालिकेसाठी संघात निवडण्यात आले होते, पण त्याला अंतिम ११ मध्ये स्थान मिळाले नव्हते. IPL मध्ये त्याने ८० सामन्यात ७८५ धावा केल्या आहेत. तर देशांतर्गत क्रिकेटमध्ये बडोद्याकडून खेळताना त्याने २८०० धावा केल्या आहेत.

रवी बिश्नोई (Ravi Bishnoi)- रवी बिश्नोईने नुकत्याच झालेल्या देशांतर्गत स्पर्धांमध्ये ६ सामन्यात १७ बळी टिपले होते. IPL मध्येही त्याने १४ सामन्यात १२ बळी मिळवले होते. नव्याने आलेल्या लखनौ सुपर जायंट्स संघाने त्याला लिलावाआधीच करारबद्ध केलं आहे.

भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar)- भुवनेश्वर हा भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज असला तरीही आफ्रिकेच्या पिचवर त्याला फारशी कमाल दाखवता आली नव्हती. त्याला पहिल्या दोन सामन्यात एकही बळी मिळवता आला नाही त्यामुळे तिसऱ्या सामन्यात त्याला संघातून वगळण्यात आलं होतं. अशा परिस्थितीत त्याला पुन्हा संधी दिल्याने साऱ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.