तिसऱ्या वन डेपूर्वी टीम इंडियाची भटकंती; धवन, पोलार्ड दिसले एकत्र

पोर्ट ऑफ स्पेन, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : भारतीय संघाने दुसऱ्या वन डेत विजय मिळवून तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील अखेरचा वन डे सामना बुधवारी खेळवण्यात येणार आहे. पण, या सामन्यापूर्वी दोन्ही संघातील खेळाडूंनी भटकंती केली. खेळाडूंनी सोशल मीडियावर त्यांचे फोटो शेअर केले आहेत.