IND vs ENG: विराट कोहली तिसऱ्या कसोटीत इंग्लंडला आश्चर्याचा धक्का देणार, दोन बदलांसह मैदानावर उतरणार!

India vs England, 3rd Test : टीम इंडियानं लॉर्ड्स कसोटी जिंकून पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. त्यात लीड्स येथे बुधवारपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटीत विजय मिळवून ही आघाडी आणखी भक्कम करण्याचा विराट कोहलीचा मानस आहे.

India vs England, 3rd Test : टीम इंडियानं लॉर्ड्स कसोटी जिंकून पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. त्यात लीड्स येथे बुधवारपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटीत विजय मिळवून ही आघाडी आणखी भक्कम करण्याचा विराट कोहलीचा मानस आहे.

इंग्लंड संघातील एकामागून एक खेळाडू दुखापतीमुळे माघार घेत आहेत आणि त्यामुळे तिसऱ्या सामन्यातही टीम इंडियाचेच पारडे जड मानले जात आहे. त्यात विराट या सामन्यासाठी मोठा डाव खेळण्याच्या तयारीत आहे.

टीम इंडिया दोन बदलांसह मैदानावर उतरण्याची शक्यता आहे आणि हे दोन बदल मधल्या फळीतील फलंदाज व गोलंदाज असे असतील. उपकर्णधार अजिंक्य रहाणे यानंही शार्दूल ठाकूर पूर्णपणे तंदुरुस्त झाल्याचे सांगितले आहे. त्यामुळे तिसऱ्या कसोटीत त्याचाही पर्याय विराटसमोर आहे.

तिसऱ्या कसोटीत टीम इंडिया पहिला बदल करेल तो आर अश्विन याचा. दोन कसोटीत रवींद्र जडेजाला फार चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात अश्विनला संधी मिळू शकते. जडेजाला पहिल्या दोन कसोटीत एकही विकेट घेता आली नाही.

संघातील दुसरा बदल हा शार्दूल ठाकूर असू शकतो. त्याला इशांत शर्माच्या जागी संधी मिळू शकते. शार्दूलनं पहिल्या कसोटीत चार विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर दुखापतीमुळे त्याला दुसऱ्या कसोटीला मुकावे लागले होते. शार्दूल गोलंदाजीसोबत फलंदाजीतही उपयुक्त ठरू शकतो.

भारताचे माजी दिग्गज फारूख इंजिनियर यांनी तिसऱ्या कसोटीत चेतेश्वर पुजाराच्या जागी सूर्यकुमा यादवला संधी द्या अशी मागणी केली आहे. पण, तसे होणे अवघड आहे.

टीम इंडियाचा संभाव्य संघ - विराट कोहली, रोहित शर्मा, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर