India vs Afghanistan : या पाच अफगाणी खेळाडूकडून भारतीय संघाला धोका

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये उद्या १४ जूनपासून बंगळुरुच्या चिन्नास्वामी मैदानात ऐतिहासिक कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. या ऐतिहासिक सामन्यामध्ये भारतीय संघाला अफगाणिस्तानचे हे पाच खेळाडू धोकादायक ठरु शकतात.

भारतीय संघाला सर्वात जास्त धोका जादुई गोलंदाज राशिद खानकडून असेल. आयपीएलमध्ये त्याने भारतीय फंलदाजांना बाद केले होते. वन-डेमध्ये सर्वाधिक वेगवान 100 विकेट घेणारा गोलंदाज आहे.

मुजीब रहमान या 17 वर्षीय अफगाण गोलंदाजाने आयपीएलमध्ये आपली छाप सोडली होती.

अफगाणिस्तान संघातील विकेटकीपर फलंदाज मोहम्मद शहजाद भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीचा फॅन आहे. शहजादच्या नावावर टी-20मध्ये शतक आहे.

अफगानिस्तानचा कर्णधार असगर स्टॅनिकजई दमदार आणि संयमी फलंदाजी करतो. 30 वर्षीय असगरकडे 86 वन-डे आणि 54 टी-20 सामन्याचा अनुभव आहे.

आफगाणीस्थानचा माजी कर्णधार 33 वर्षीय मोहम्मद नबी संघातील सर्वात अनुभवी खेळाडू आहे. त्याच्या अनुभवाचा संघाला फायदा होईल. 98 वन-डे आणि 63 टी-20 सामने खेळण्याचा त्याच्याकडे दांडगा अनुभव आहे. 103 विकेट आणि 2287 धावा नबीच्या नावावर आहेत.