Team India Playing XI Prediction, IND vs NZ 2nd T20: आजच्या मॅचसाठी कर्णधार Hardik Pandya करणार 'या' खेळाडूंचा पत्ता कट?

पहिल्या टी२० मध्ये भारताचा पराभव, आज रंगणार दुसरा सामना

Team India Playing XI prediction for IND vs NZ 2nd T20: भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील दुसरा टी२० सामना आज लखनौमध्ये खेळवला जाणार आहे. पहिल्या सामन्यात टीम इंडियाला २१ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) 'यंग ब्रिगेड'ला आजचा सामना हा मालिका जिवंत ठेवण्यासाठी जिंकणे क्रमप्राप्त आहे. आजचा सामना भारतासाठी 'करो या मरो' असा झाला आहे.

या मालिकेत रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल या ३ अनुभवी फलंदाजांना विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे दुसऱ्या टी२० सामन्यासाठी भारतीय संघाच्या प्लेईंग-११ वरही चाहत्यांची नजर असेल. सामना जिंकण्यासाठी हार्दिक पांड्या आजच्या सामन्यात दोन विशेष खेळाडूंचा संघातून पत्ता कट करू शकतो असं बोलले जात आहे.

भारतीय संघासाठी सर्वात मोठा चिंतेचा विषय म्हणजे इशान किशन आणि दीपक हुडा यांचा फॉर्म आहे. बांगलादेशविरुद्ध द्विशतक झळकावल्यानंतर इशान किशन फॉर्मशी झुंजत आहे. वन डे आणि टी२० मध्ये मिळून इशानची गेल्या सात डावांमध्ये धावसंख्या खूपच कमी आहे. त्यामुळे त्याचा संघातून पत्ता कट होऊ शकतो.

दीपक हुडालाही मधल्या फळीतील फलंदाज म्हणून खेळवले जात असले, तरी त्याला फारसे यश मिळालेले नाही. गेल्या १३ डावांमध्ये त्याची सरासरी केवळ १७.८८ आहे. पहिल्या टी२० मध्ये दीपक हुडाने १० चेंडूत दहा धावा करू शकला. अशा परिस्थितीत दीपक हुडाचा स्ट्राइक रेट हा चिंतेचा विषय आला आहे. त्यामुळे त्यालाही संघातून बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो.

इशान किशन आणि दीपक हुडा या दोन खेळाडूंच्या जागी भारतीय संघात दोन दमदार युवा खेळाडूंना संधी देण्यात येऊ शकते. यष्टीरक्षक जितेश शर्मा आणि पृथ्वी शॉ यांचा टीम इंडियामध्ये समावेश केला जाऊ शकतो. तसे झाले तर पृथ्वी शॉ सलामीवीर म्हणून इशान किशनच्या जागी खेळू शकेल आणि जितेश शर्मा मधल्या फळीत खेळताना दिसेल.

हार्दिक पंड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), शुभमन गिल, पृथ्वी शॉ, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल , अर्शदीप सिंग, उमरान मलिक, शिवम मावी आणि मुकेश कुमार.