IND vs ENG : तिसऱ्या कसोटीपूर्वी टीम इंडियाच्या खेळाडूंच्या फोटोसोबत खोडसाळपणा, Photo Viral

India vs England : इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय संघानं १-० अशी आघाडी घेतली आहे. भारतानं दुसऱ्या कसोटीत इंग्लंडवर १५१ धावांनी विजय मिळवला. आता बुधवारपासून लीड्सला तिसरी कसोटी खेळवली जाणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय खेळाडूंच्या फोटोसोबत खोडसाळपणा करण्यात आला आहे. यात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह यांच्यासह अनेक खेळाडूंचा लठ्ठ असलेला फोटो पोस्ट करण्यात आला आहे, Alternative Commentary Collective (ACC) या इस्टाग्राम अकाऊंटवरून हे पोस्ट व्हायरल केले गेले आहेत. याआधी याच अकाऊंटवरून WTC Final दरम्यान विराट कोहलीचा अपमान करणारा फोटो पोस्ट केला गेला होता.

WTC Final दरम्यान विराट कोहलीचा अपमान करणारा फोटो पोस्ट केला गेला होता. यात किवी गोलंदाज कायले जेमिन्सन हा महिलेच्या रुपात दाखवला होता अन् तिच्या हातातील पट्ट्यात दिसणाऱ्या व्यक्तिला विराट कोहलीचे नाव देण्यात आले होते.

मोहम्मद शमी

रिषभ पंत

रोहित शर्मा

रवींद्र जडेजा

चेतेश्वर पुजारा

इशांत शर्मा

जसप्रीत बुमराह

विराट कोहली