Rishabh Pant, IND vs ENG 5th Test : रिषभ पंत - रवींद्र जडेजा जोडीने पहिल्याच दिवशी मोडले 12 मोठे विक्रम, जाणून घ्या एका क्लिकवर!

IND vs ENG 5th Test : रिषभ पंतने भारत-इंग्लंड पाचव्या कसोटीच्या पहिल्या दिवशी धुमाकुळच घातला... ट्वेंटी-20 मालिकेत थंड पडलेली रिषभची बॅट कसोटीत तळपली अन् त्याच्या 146 धावांच्या स्फोटक खेळीने सारे चित्र बदलले.

India vs England 5th Test : रिषभ पंतने भारत-इंग्लंड पाचव्या कसोटीच्या पहिल्या दिवशी धुमाकुळच घातला... ट्वेंटी-20 मालिकेत थंड पडलेली रिषभची बॅट कसोटीत तळपली अन् त्याच्या 146 धावांच्या स्फोटक खेळीने सारे चित्र बदलले. भारताची अवस्था 5 बाद 98 अशी झाली होत, परंतु रिषभ व रवींद्र जडेजा यांच्या 222 धावांच्या विक्रमी भागीदारीने भारताला 7 बाद 338 धावांपर्यंत मजल मारून दिली. रिषभ-जडेजाच्या या खेळीने अनेक विक्रम मोडले गेले.

निम्मा संघ 100 धावसंख्येच्या आता माघारी परतल्यानंतर रिषभ पंत व रवींद्र जडेजा यांची 222 धावांची भागीदारी ही कसोटी क्रिकेटमध्ये सहाव्या किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमवारीत केलेली भारताकडून केलली सर्वोत्तम भागीदारी ठरली. 1996मध्ये दक्षिण आफ्रिकेत कसोटीत भारताची अवस्था 5 बाद 58 असताना मोहम्मद अझरुद्दीन व सचिन तेंडुलकर यांनी 222 धावांची भागीदारी केली.

परदेशात सहाव्या किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकासाठी 222 धावा या भारताकडून झालेली संयुक्तरित्या सर्वोत्तम भागीदारी आहे. रिषभ व जडेजा यांनी एडबस्टन कसोटीत काल 222 धावा चोपल्या, त्याआधी 1996मध्ये सचिन तेंडुलकर व मोहम्मद अझरुद्दीन यांनी दक्षिण आफ्रिकेत 222 धावांची भागीदारी केली होती.

रिषभ पंत व रवींद्र जडेजा ही सहाव्या किंवा त्याच्या खालच्या क्रमवारीत दोन वेळा द्विशतकीय भागीदारी करणारी चौथी जोडी आहे. या दोघांनी 2019मध्ये सिडनी कसोटीत सातव्या विकेटसाठी 204 धावांची भागीदारी केली होती.

रिषभ पंतचे हे पाचवे कसोटी शतक ठरले आणि यापैकी चार शतकं ही परदेशात झळकावली आहेत. 25 वर्षांच्या आत आशिया खंडाबाहेर सर्वाधिक 7 शतकं ही भारताच्या केवळ दोनच ( सचिन तेंडुलकर व सुनील गावस्कर ) फलंदाजांना झळकावता आलेली आहेत.

रिषभ पंतने 89 चेंडूंत हे शतक पूर्ण केले. इंग्लंडमध्ये भारताकडून हे दुसरे जलद शतक ठरले. यापूर्वी 1990मध्ये मोहम्मद अझरुद्दीनने लॉर्ड्स कसोटीत 87 चेंडूंत शतक झळकावले होते.

रिषभने 111 चेंडूंत 146 धावा केल्या आणि त्याचा स्ट्राईक रेट हा 131.53 इतका होता. स्ट्राईक रेटनुसार भारताकडून ही दुसरी जलद सेंच्युरी ठरली. 1996मध्ये कोलकाता कसोटीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अझरुद्दीनने 141.55च्या स्ट्राईक रेटने 77 चेंडूंत 109 धावा केल्या होत्या.

मोहम्मद अझरुद्दीनने 2006मध्ये फैसलाबाद कसोटीत पाकिस्तानविरुद्ध 93 चेंडूंत शतक झळकावले होते आणि हे भारतीय यष्टिरक्षकाने झळकावलेले सर्वात जलद शतक होते. पण, धोनीचा हा विक्रम पंतने शुक्रवारी बर्मिंगहॅम कसोटीतून तोडला.

रिषभने आजच्या सामन्यात सर्वात कमी वयात १०० षटकार खेचणाऱ्या भारतीय फलंदाजासह, सर्वात जलद २०००+ कसोटी धावा करणाऱ्या यष्टिरक्षकाचा विक्रम नावावर केला.

१४५ वर्षांच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात इंग्लंडमध्ये पाहुण्या संघातील यष्टीरक्षकाने दोन शतक आतापर्यंत कधीच झळकावली नव्हती. पण, रिषभच्या आजच्या शतकाने वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला.

रिषभने ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका व इंग्लंड येथे चार कसोटी शतकं झळकावली आहेत. एडबस्टन येथे कसोटी शतक झळकावणारा रिषभ हा सचिन तेंडुलकर ( १२२) व विराट कोहली ( १४९) यांच्यानंतरचा तिसरा भारतीय ठरला. रिषभने १४६ धावा करून तेंडुलकरचा एडबस्टनवरील विक्रम मोडला.

रिषभ व जडेजा यांनी द्विशतकी भागीदारी पूर्ण करून आणखी एक विक्रम नोंदवला. इंग्लंडमध्ये पाच किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावरील ही भारताकडून झालेली सर्वोत्तम भागीदारी ठरली. यापूर्वी २०१८मध्ये रिषभ व लोकेश राहुल यांनी ओव्हल कसोटीत २०४ धावांची भागीदारी केली होती.

सुनील गावस्कर व चेतन चौहान यांनी १९७९साली एडबस्टन येथे १२४ धावांची भागीदारी केली होती. त्यानंतर रिषभ-जडेजाने येथे शतकी भागीदारी केली. जो रूटने ही विकेट मिळवून दिली.