टीम इंडियाने धर्मशाला कसोटी जिंकताच ११२ वर्षानंतर इतिहास घडणार; इंग्लंडचे नाक कापणार

IND vs ENG 5th Test : भारत आणि इंग्लंड संघ हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर जवळपास दोन आठवड्याच्या विश्रांतीनंतर पाचवी आणि शेवटची कसोटी खेळण्यासाठी सज्ज आहेत.

टीम इंडियाने मालिकेत ३-१ अशी विजयी आघाडी घेतली आहे. अशा स्थितीत शेवटच्या सामन्यात इंग्लंड संघाला आपली लाज वाचवायची आहे. हैदराबाद कसोटी गमावल्यानंतर रोहित शर्मा आणि कंपनीने मागे वळून पाहिले नाही. टीम इंडिया ही मालिका ४-१ ने जिंकू इच्छित आहेत.

मालिकेच्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा २८ धावांनी पराभव झाला. पण, टीम इंडियाने पुढील तीन कसोटी सामने जिंकून मालिका जिंकली. अशा प्रकारे टीम इंडियाने घरच्या भूमीवर १७ वी मालिका जिंकली. भारताने मालिका जिंकली असेल पण इंग्लंड संघाला भारतीय भूमीवर दोन कसोटी जिंकणारा २१व्या शतकातील तिसरा संघ बनण्याची संधी आहे.

७ मार्चपासून धर्मशाला कसोटी सुरू होत आहे. अशा परिस्थितीत जर टीम इंडियाने मालिका ४-१ ने जिंकली, तर पहिली कसोटी गमावल्यानंतरही या फरकाने मालिका जिंकणारा ११२ वर्षांच्या इतिहासातील हा पहिला संघ बनेल.

इंग्लंड संघाने शेवटच्या वेळी ऑस्ट्रेलियन भूमीवर हा पराक्रम १९१२ मध्ये केला होता आणि ॲशेस मालिका जिंकली होती. आत्तापर्यंत असे फक्त तीन वेळा घडले आहे जेव्हा मालिकेत ०-१ ने पिछाडीवर असतानाही संघांनी अखेरीस ४-१ ने मालिका जिंकली आहे. इंग्लंडने १९१२ मध्ये हे केले. ऑस्ट्रेलियाने १८९७/९८ आणि १९०१/०२ मध्ये इंग्लंडविरुद्ध अशी कामगिरी केली होती.

पहिली कसोटी गमावल्यानंतर टीम इंडियाने मालिका जिंकण्याची ही सातवी वेळ असेल. याआधी संघाने १९७२/७३ मध्ये इंग्लंडला घरच्या मैदानावर पराभूत केले होते. टीम इंडियाने २००१ मध्ये घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध, २०१५ मध्ये श्रीलंकेविरुद्ध, २०१७ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणि त्यानंतर २०२०/२१ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणि २०२१ मध्ये घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध विजय मिळवला होता.