Ind vs Eng 1st T20 : श्रेयस अय्यरनं रोहित शर्माच्या ११ वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी केली बरोबरी, विराटच्या नावावर नकोसा पराक्रम

टीम इंडियाला २० षटकांत ७ बाद १२४ धावांचा समाधानकारक पल्ला गाठता आला. श्रेयस ४८ चेंडूंत ८ चौकार व १ षटकारासह ६७ धावांवर माघारी परतला. Ind Vs Eng 1st T20 Match Today, Ind Vs Eng 1st T20 Live Match

- रोहित शर्माला ( Rohit Sharma) विश्रांती देऊन पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात ( Ind Vs Eng 1st T20 Live Match) लोकेश राहुल ( KL Rahul) आणि शिखर धवन ( Shikhar Dhawan) ही नवी जोडी सलामीला उतरवण्याचा निर्णय फसला. राहुल ( १), कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) भोपळा आणि शिखऱ धवन ( ४) हे आघाडीचे तीन फलंदाज झटपट माघारी परतल्यानं टीम इंडिया अडचणीत आली होती.

- रिषभ पंतनं ( Rishabh Pant) फटकेबाजी करून गाडी रुळावर आणली. रिषभ २३ चेंडूंत २ चौकार व १ षटकार खेचून २१ धावांवर बेन स्टोक्सच्या गोलंदाजीवर झेलबाद होऊन माघारी परतला. हार्दिक २१ चेंडूंत १९ धावा ( १ चौकार व १ षटकार) करून माघारी परतला.

- जोफ्रा आर्चरनं ( Jofra Archer) ४ षटकांत १ निर्धाव षटक टाकून २३ धावांत ३ विकेट्स घेतल्या. Ind vs Eng Live Score Today टीम इंडियाला २० षटकांत ७ बाद १२४ धावांचा समाधानकारक पल्ला गाठता आला. श्रेयस ४८ चेंडूंत ८ चौकार व १ षटकारासह ६७ धावांवर माघारी परतला. Ind Vs Eng 1st T20 Match Today, Ind Vs Eng 1st T20 Live Match

- ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये पाचव्या क्रमांकावर सर्वोत्तम वैयक्तिक खेळी करणाऱ्या भारतीय फलंदाजांत श्रेयस अय्यरनं तिसरं स्थआन पटकावलं. मनीष पांडे ( ७९* वि. दक्षिण आफ्रिका, २०१८), युवराज सिंग ( ७७* वि. ऑस्ट्रेलिया, २०१३) यांच्यानंतर आज श्रेयसच्या खेळीनं नंबर लावला. त्यानं युवराज सिंग ( ५८ वि. इंग्लंड, २०१७) व केदार जाधव ( ५८ वि. झिम्बाब्वे, २०१६) यांचा विक्रम मोडला.

- २० षटकं खेळून भारताची आजची धावसंख्या ही तिसरी निचांकी धावसंख्या ठरली. यापूर्वी २००९ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ८ बाद ११८ आणि २०११ मध्ये इंग्लंडविरुद्ध ९ बाद १२० धावा केल्या होत्या.

- भारताकडून चौथ्या क्रमांकावर ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतक झळकावण्याच्या विक्रमात युवराज सिंग ( ८) आघाडीवर आहे. त्यानंतर श्रेयस अय्यर, रोहित शर्मा व मनीष पांडे ( प्रत्येकी ३ ) यांचा क्रमांक येतो.

- विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या ४७५ इनिंगमध्ये सलग दोनवेळा शून्यावर बाद होण्याची ही पहिलीच वेळ ठरली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणाऱ्या भारतीय फलंदाजांत विराटनं चौथं स्थान पटकावलं. सचिन तेंडुलकर ( ३४), वीरेंद्र सेहवाग ( ३१), सौरव गांगुली २९, विराट ( २८) आणि युवराज सिंग ( २६) असे टॉप फाईव्ह फलंदाज आहेत.

- आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शून्यावर सर्वाधिकवेळा बाद होणाऱ्या भारतीय कर्णधारांत विराटनं सौरव गांगुलीला मागे टाकले. विराट १४ वेळा, तर गांगुली १३ वेळा कर्णधार म्हणून शून्यावर बाद झाला आहे.

- भारताचे आघाडीचे तीन फलंदाज एकेरी धावेत माघारी परतल्यानंतर अर्धशतक झळकावणारा श्रेयस हा दुसरा भारतीय ठरला. यापूर्वी २०१०मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध रोहितनं असा पराक्रम केला होता.