बापरे! कोहली वर्षाला किती कमावतो ते पाहाल, तर चक्रावून जाल...

शिखर धवन : भारताचा सलामीवीर शिखर धवन हा सध्या चांगल्या फॉर्ममध्ये दिसत नाही. धवनकडे जाहिरातीही फार दिसत नाहीत. पण तरीही धवन एका वर्षात पाच कोटी रुपये जाहिरातींमधून कमावतो.

रोहित शर्मा : भारताचा हिटमॅन रोहित शर्माने विश्वचषक चांगलाच गाजवला होता. रोहितकडे बरेच आंतरराष्ट्रीय ब्रँड आहेत. रोहित वर्षाला 7.2 कोटी रुपये एवढी रक्कम कमावतो.

हार्दिक पंड्या : आपल्या वर्तनामुळे हार्दिक पंड्या नेहमी चर्चेत असतो. पण जाहिरातींमध्ये मात्र तो धवन आणि रोहित यांच्या पुढे निघून गेला आहे. वर्षभरात पंड्या 14 कोटी रुपयांची कमाई करतो.

महेंद्रसिंग धोनी : या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे महेंद्रसिंग धोनी. वर्षभरात धोनी 120 कोटी रुपयांची कमाई करतो.

विराट कोहली : वर्षभरातील कमाईमध्ये कोहली भारतीय क्रिकेटमध्ये अव्वल स्थानी असल्याचे समजते. एका वर्षात कोहली 146 कोटी रुपये कमावतो, असे म्हटले जात आहे.Vir