सौ शहरी, एक संगमनेरी... टीम इंडियाच्या 'अजिंक्य' विजयावर काँग्रेस नेत्याचं ट्वीट

भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका जिंकून इतिहास रचला आहे. दुखापतींवर मात करत अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील नव्या दमाच्या भारतीय संघाने कांगारुंना चितपट करुन मिळवलेल्या विजयाचं सर्वांकडून कौतुक होत आहे.

ऋषभ पंतने ब्रिस्बेन कसोटीच्या पाचव्या दिवशी ९६ व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर ऑस्ट्रेलियाच्या जोश हेझलवूडच्या गोलंदाजीवर खणखणीत चौकार खेचला आणि भारताने कसोटी जिंकली

ऑस्ट्रेलियाचा संघ ब्रिस्बेनमध्ये (गाबा) ३३ वर्षांपासून म्हणजेच १९८८ कधीही पराभूत झालेला नव्हता आणि भारताविरुद्ध गाबाच्या मैदानात एकही सामना गमावलेला नव्हता. परंतु अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वातील भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचं गर्वहरण केलं.

३३ वर्षांचे दिवस मोजायले गेलो, तर १२ हजार ०४ दिवसांनी भारताने गाबामध्ये तिरंगा फडकविला असं म्हणावं लागेल.

टीम इंडियाच्या या विजयानंतर जगभरातून भारतीय संघाचं कौतुक होत असून अभिनंदनाचा वर्षाव अजिंक्य भारतावर होत आहे.

प्रमुख खेळाडू जायबंदी होत असताना अजिंक्यनं मोठ्या कौशल्यानं सहकाऱ्यांना सोबत घेऊन एकजुटीनं कांगारूंचा सामना केला आणि इतिहास घडवला. शुबमन गिल, रिषभ पंत आणि चेतेश्वर पुजारा यांनी शानदार खेळ केला. ऑस्ट्रेलियानं ठेवलेले ३२८ धावांचे लक्ष्य टीम इंडियानं ३ विकेट्स राखून पार केले

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन टीम इंडियाचं कौतुक करताना, प्रत्येक सिझनमध्ये आपल्याला नवीन हिरो गवसतो, असे म्हटलंय.

आर. आश्विननेही ट्विट करुन भारतीय संघाच्या विजयाचं कौतुक केलंय. तसेच, मी खेळू शकलो नाही, त्याबद्दल क्षमस्व असेही तो म्हणाला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ट्विट करुन टीम इंडियाच्या विजयाबद्दल अभिनंदन केलंय. आपला विजय नोंदणीय असल्याचं मोदींनी म्हटंल.

काँग्रसचे नेते सत्यजीत तांबे यांनी सौ शहरी.. एक संगमनेरी असे म्हणत अजिंक्य रहाणे संगमनेरचा असल्याचा म्हटंलय. पण, काही जणांनी तो कोल्हापूरचा असून संगमनेरचा त्याचा जन्म असल्याचं सांगितलंय.

भारतीय महिला क्रिकेट संघाची धडाकेबाज फलंदाज स्मृती मानधना हिनेही टीम इंडियाच्या यशाबद्दल संघाचे अभिनंदन केलंय.