Dipika Pallikal Love Dinesh Karthik : क्रिकेटपटूंचा तिरस्कार करणारी दीपिका कशी पडली दिनेश कार्तिकच्या प्रेमात?; पहिल्या पत्नीच्या अफेअरमुळे झालेला हताश

भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिक ( Dinesh Karthik) आयपीएल २०२२ गाजवतोय. यंदा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळणाऱ्या दिनेशने दोन सामन्यांत मॅच फिनिशरची भूमिका बजावताना संघाला विजय मिळवून दिला. तेच दुसरीकडे दोन मुलांची आई झाल्यानंतर स्क्वॉश कोर्टवर परतलेली त्याची पत्नी दीपिका पल्लीकलने World doubles championships स्पर्धेत मिश्र व महिला दुहेरीचे सुवर्णपदक पटकावले.

भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिक ( Dinesh Karthik) आयपीएल २०२२ गाजवतोय. यंदा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळणाऱ्या दिनेशने दोन सामन्यांत मॅच फिनिशरची भूमिका बजावताना संघाला विजय मिळवून दिला.

तेच दुसरीकडे दोन मुलांची आई झाल्यानंतर स्क्वॉश कोर्टवर परतलेली त्याची पत्नी दीपिका पल्लीकलने World doubles championships स्पर्धेत मिश्र व महिला दुहेरीचे सुवर्णपदक पटकावले.

दिशेन कार्तिकची ही दुसरी पत्नी आहे. पहिल्या पत्नीचे सहकारी मुरली विजय याच्यासोबत अफेअऱ असल्याचे समजताच दिनेशने तिला घटस्फोट दिला. या धक्क्यानंतर तो नैराश्येत गेला होता अन् त्याचवेळी त्याची व दीपिकाची भेट झाली. पण, दीपिका ही क्रिकेटपटूंचा तिरस्कार करायची... मग ही जोडी कशी जमली?

२००४मध्ये दिनेश कार्तिकने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. २०१८ मध्ये त्याने आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचे नेतृत्व सांभाळले होते. २०१५ मध्ये त्याने दीपिकासोबत लग्न केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दिनेशने अनेक चढऊतार पाहिले, तसेच त्याच्या खासगी आयुष्यातही बरीच उलथापालथ झाली.

दीपिका ही त्याची पहिली पत्नी नाही. दिनेशच्या पहिल्या पत्नीचे नाव निकिता असे आहे. २००७मध्ये या दोघांनी विवाह केला होता. परंतु काही वर्षांनंतर निकिता आणि मुरली विजय यांचे अफेअर त्याला माहीत पडले आणि २०१२ मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला. निकिताने त्यानंतर मुरली विजयशी लग्न केले.

या धक्क्यामुळे दिनेश प्रचंड निराश झाला होता आणि याच कालावधीत त्याची व दीपिकाची भेट झाली. दोघंही एकाच जिममध्ये वर्कआऊट करायला यायचे. दीपिकाला क्रिकेटपटू आवडायचे नाही. त्यामुळे दिनेशसोबतच्या पहिल्या भेटीत तिने त्याला फार भाव दिला नाही. पण, हळुहळू दिनेशचा स्वभाव तिला समजला.

दिनेश हा खुप प्रेमळ व्यक्ती असल्याचे तिला जाणवले आणि ती त्याच्या प्रेमात पडली. दिनेशने अनेकदा तिला डेटसाठी विचारले होते, परंतु तिने नकार दिला.

२०१३ मध्ये दिपिकाने कॅनडा येथे स्पर्धा जिंकली होती आणि दिनेश त्यावेळी भारताता स्थानिक स्पर्धेत खेळत होता. दीपिका तेथून इंग्लंडमध्ये सरावासाठी गेली आणि दिनेश तिथे पोहोचला. तिथेच दीपिका घायाळ झाली.

त्यानंतर दीपिका स्टेडियममध्ये दिनेश कार्तिकचा खेळ पाहायला जायला लागली, आयपीएलचे काही सामनेही तिने पाहिले. पण, या दोघांनी त्यांचे नाते जगजाहीर केले नव्हते. वर्षभराच्या मैत्रीनंतर दिनेशने तिला प्रपोज केले आणि तिनेही होकार दिला.

२०१५मध्ये दीपिकाने त्याच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. या दोघांचे लग्न हिंदू व ख्रिश्चन अशा दोन्ही पद्धतीने झाले. या दोघांना नुकतीच जुळी मुलं झाली.