हार्दिक पांड्याने गर्लफ्रेंड माहिकासोबतच्या खास फोटोंसह शेअर केली नव्या प्रेमाची खास गोष्ट

हार्दिक पांड्या आणि माहिका शर्मा यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

भारतीय संघाचा ऑलराउंडर हार्दिक पांड्या आणि मॉडेल माहिका शर्मा ही जोडी जमल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगताना पाहायला मिळत आहे.

हार्दिक पांड्यानं आपला ३२ वा वाढदिवस माहिकासोबत साजरा केल्याचे पाहायला मिळाले.

बर्थडे सेलिब्रेशनचे खास फोटो शेअर करताना हार्दिक पांड्याने माहिकासोबतचा 'हॉट अँण्ड बोल्ड' अंदाजातील खास फोटो शेअर केला अन् दोघांच्या डेटिंगचा खेळ सुरु असल्याची गोष्ट खरी ठरली.

हार्दिक आणि माहिका यांनी दिवाळीचा सणही एकत्रच साजरा केला. या जोडीचा पारंपारिक अंदाजातील लूक सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असताना आता हार्दिक पांड्याने नव्या गर्लफ्रेंडसोबतचे खास फोटो शेअर करत नव्या प्रेमाची खास गोष्ट शेअर केली आहे.

हार्दिक पांड्याने माहिका शर्माचा हातात हात घेऊन क्लिक केलेला खास फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केला आहे.

प्रेमाची नवी आस अन् पांड्याच्या हातात तिचा हात..ही गोष्ट क्रिकेटरनं माहिकाच्या साथीनं आपल्या आयुष्यातील नव्या इनिंगला सुरुवात केल्याची गोष्ट अगदी स्पष्टपणे सांगणारी आहे.

दोघांचा कडक स्टायलिश अंदाज अन् प्रेमाचा गोडवा दाखवणारी ही खास फ्रेमही हार्दिक पांड्याने शेअर केल्याचे दिसते.