पांड्याच्या प्रेमाचा स्वॅग! क्रिकेटरनं शेअर केली 'त्या' ब्युटीसोबतची रोमँटिक फोटो स्टोरी

हार्दिक पांड्यानं त्या ब्युटीसोबतचे खास फोटो शेअर करत दिली प्रेमाची कबुली?

भारतीय संघाचा अष्टपैलू क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि अभिनेत्री, मॉडल आणि फिटनेस कंटेंट क्रिएटर माहिका शर्मा यांच्यात प्रेमाचा खेळ रंगल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगत होती.

आता खुद्द हार्दिक पांड्यानेच तिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची गोष्ट कबुली दिल्याचे पाहायला मिळत आहे. पांड्याच्या हातात जी बॅग दिसतीये ना ती त्या प्रेमाचा एक पुरावाच आहे.

जिच्यासोबत डेटिंगची चर्चा सुरु आहे तिच्यासोबत हार्दिक पांड्या एअरपोर्टवर स्पॉट झाला. पहिल्या फोटोत पांड्याच्या हातात जी लेडी बॅग दिसली ती या फोटोत माहिकानं कॅरी केल्याचे दिसते. जोडीनं ते कुठंतरी फिरायला चालल्याचे या फोटोतून स्पष्ट होते.

मग हार्दिक पांड्याने आपल्या इन्स्टा स्टोरी माध्यमातूनही तिच्यासोबत अगदी बिनधास्त अंदाजात फोटो शेअर केले. त्याची ही फ्रेम प्रेमाची कबुली देणारी अशीच आहे.

पांड्याच्या प्रेमाचा खरा स्वॅग तर या फोटोत दिसतो. आली लहर केला कहर या धाटणीत त्याने प्रेमाची माहिकासोबत हॉट अँण्ड रोमँटिक फोटोही शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना त्याने तिला टॅगही केल्याचे दिसून येते.

हार्दिक पांड्याने तिच्यासोबतचे खास फोटो शेअर करण्याआधी प्लेनमधून खास नजारा दाखवून दिलाय. ही गोष्ट जोडीच्या प्रेमाच्या प्रवासाच्या स्टोरीचा एक भागच असावी असे दिसते.

हार्दिक पांड्या हा क्रिकेटच्या मैदानातील कामगिरीशिवाय आपल्या हटके स्टायलिश अंदाजासाठी ओळखला जातो. दुसरीकडे त्याच्यासोबत भटकंतीला गेलेली माहिरा ही देखील हॉट अँण्ड ब्युटीफुल लूकसह सोशल मीडियावर मैफिल लुटताना दिसते.

हार्दिक पांड्यानंमाहिका शर्मासोबतचा खास फोटो शेअर केल्यावर आता त्याची पुढची स्टोरी काय? याकडे चाहते निश्चित डोळे लावून बसतील.

पांड्यानं तिची खास झलक दाखवली असली तरी माहिका शर्माच्या इन्स्टा स्टोरीत पांड्याची खास फ्रेम दिसलेली नाही. ती फ्रेम कोणती असेल? याचीही दोघांच्या चाहत्यांमध्ये निश्चितच उत्सुकता आहे,