HappyBirthdaySachin : अंजलीला 'डेट' करण्यासाठी सचिन तेंडुलकर सरदार बनला, अन्...

महान फलंदाज सचिन तेंडुलकर याचा आद जन्मदिवस...आज तो 47 वर्षांचा झाला आहे. सचिन तेंडुलकर आणि विक्रम हे अतुट नातं त्याच्या 24 वर्षांच्या कारकिर्दीत कायम राहिले. पण, या विक्रमाच्या विश्वापासून तेंडुलकरनं एक वेगळं आयुष्य आहे आणि त्याच्या त्या आयुष्याची स्टोरीही एखाद्या चित्रपटासारखीच आहे.

2013मध्ये तेंडुलकरनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, परंतु सात वर्षांनंतरही त्याचे अनेक विक्रम अबाधित आहेत. पण, आज आपण त्याच्या विक्रमापलिकडील दुसऱ्या आयुष्याबाबत जाणून घेणार आहोत.

सचिन तेंडुलकर आणि अंजली यांची लव्ह स्टोरी एखाद्या बॉ़लिवूड चित्रपटासारखी आहे. 1990मध्ये सचिन-अंजलीच्या लव्ह स्टोरीला सुरुवात झाली.

तेंडुलकर इंग्लंड दौऱ्यावरून मायदेशी परतला होता आणि विमानतळावर त्याला पाहण्यासाठी लोकांची गर्दी जमली होती. तिथे अंजली तिच्या आईची वाट पाहत होती.

तेव्हाच सचिन आणि अंजलीनं पहिल्यांदा एकमेकांना पाहिले. अंजली तेव्हा डॉक्टर बनली होती आणि एका हॉस्पिटलमध्ये तिचा सराव सुरू होता.

विमानतळावर तिच्या मैत्रिणीनं जेव्हा तो सचिन तेंडुलकर आहे असे सांगितले, तेव्हा ऑटोग्राफ घेण्यासाठी ती त्याच्या मागे धावली होती. ते पाहून सचिन लाजला होता.

1990मध्ये मोबाईल नव्हते आणि अंजलीनं अनेक प्रयत्नांनंतर तेंडुलकरच्या घरचा नंबर मिळवला होता. तेव्हा सचिन-अंजलीचे फोनवर बोलणं सुरू झाले.

अशात पत्रकार बनून अंजली थेट सचिनच्या घरी पोहोचली होती. पण, अंजली घरी पोहोचली तेव्हा सचिनच्या आईला थोडा संशय आला. ही गोष्ट अंजलीनं एका मुलाखतीत सांगितली होती.

एव्हाना सचिन एक स्टार बनला होता आणि त्यामुळे त्याला अंजलीला सार्वजनिक ठिकाणी भेटता येत नव्हते. त्यावरही सचिननं एक पर्याय शोधून काढला.

सचिन - अंजलीनं एक दिवस चित्रपट पाहण्याचा प्लान केला. त्यासाठी सचिननं सरदारचा रुप घेतला.. पगडी घालून तो अंजलीसोबत चित्रपट पाहयला गेला.

सचिन-अंजलीनं पाहिलेला तो चित्रपट 'रोजा' हा होता. चित्रपटाच्या मध्यंतराला थिएटरमधील लाईट ऑन झाली, तेव्हा लोकांनी त्याला ओळखले. त्यामुळे त्यांना चित्रपट अर्धवट सोडून घरी परतावे लागले.

23 मे 1995मध्ये सचिन आणि अंजलीनं लग्न केलं. अंजली स्वतःहून लग्नाचा प्रस्ताव घेऊन सचिनच्या घरी गेली होती.