Story Behind Gujarat Titans Name : गुजरातमध्ये नरेंद्र मोदी स्टेडियम आहे, सर्वात मोठा पुतळा आहे; अहमदाबाद फ्रँचायझीने सांगितले नावामागचं कारण

Story Behind Gujarat Titans Name, IPL 2022 : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वात नव्याने दाखल झालेल्या अहमदाबाद फ्रँचायझीने त्यांच्या टीमचे नाव गुजरात टायटन्स असे ठेवले.

Story Behind Gujarat Titans Name, IPL 2022 : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वात नव्याने दाखल झालेल्या अहमदाबाद फ्रँचायझीने त्यांच्या टीमचे नाव गुजरात टायटन्स असे ठेवले. हार्दिक पांड्या याच्या नेतृत्वाखाली हा संघ मैदानावर उतरणारणार आहे. CVC Capital यांनी ५,६०० कोटींत अहमदाबाद फ्रँचायझी नावावर केली आहे.

संजीव गोएंका यांच्या RPSG Group आणि CVC Capital यांनी विक्रमी किमतीत अनुक्रमे लखनौ व अहमदाबाद फ्रँचायझी खरेदी केली. RP Sanjiv Goenka यांनी सर्वाधिक ७०९० कोटींत लखनौ फ्रँचायझी नावावर केली. या नव्या करारानं बीसीसीआयला १२, ६९० कोटींचा फायदा झाला आहे.

CVC Capital कंपनीची स्थापना १९८१मध्ये झाली. १२५ बिलियन अमेरिकन डॉलर इतकी त्यांची संपत्ती आहे. युरोप व अमेरिकेत त्यांचे १६, तर आशियात ९ ऑफिस आहेत. CVC Capital यांनी नुकतेच ला लिगा क्लबमध्ये बोली जिंकली, त्यांच्याकडे फॉर्म्युला वन आणि रग्बी संघाचेही मालकी हक्क आहेत.

अहमदाबाद फ्रँचायझीने हार्दिक पांड्या ( १५ कोटी), राशिद खान ( १५ कोटी), शुबमन गिल ( ८ कोटी) यांना करारबद्ध केले आहे आणि IPL 2022 Mega Auction साठी त्यांच्याकडे ५२ कोटी शिल्लक रक्कम आहे. आता या फ्रँचायझीने गुजरात टायटन्स हेच नाव का ठेवले, यामागचं कारणही सांगितलं आहे.

आयपीएल २०२२मध्ये अनेक आव्हानांचा त्यांना सामना करायचा आहे आणि त्यामुळेच आमचे विचार आम्हाला टायटन्स बनवतात. जगातील सर्वात मोठे स्टेडियम येथे आहे. जगातील सर्वात उंच पुतळाही येथे आहे. गुजरातमधून देशाला अनेक मोठे क्रिकेटपटू मिळाले, म्हणून संघाचे नाव गुजरात टायटन्स असे ठेवण्यात आल्याचे फ्रँचायझीने सांगितले.

अहमदाबाद फ्रँचायझीचे सह मालक सिद्धार्थ पटेल यांनी सांगितले की गुजरात टायटन्स हे नाव निश्चित करण्यासाठी आम्ही खूप रिसर्च केला. त्यासाठी आम्ही एका एजेन्सीकडे काम सोपवलं होते. गुजरातची छबी आम्हाला दाखवायची आहे.