गणपती बाप्पा मोरया... सचिनसह 'या' क्रिकेटपटूंच्या घरी होते गणेशाचे आगमन

सचिन तेंडुलकरच्या घरी लाडका बाप्पा विराजमान झाला आहे.

सचिन आणि त्याची पत्नी अंजली यांनी गणपतीची मनोभावे पूजा केली.

सचिन हा लहानपणापासून गणपतीचा भक्त आहे. शिवाजी पार्कमध्ये क्रिकेट खेळण्यापूर्वी सचिन उद्यान गणेशाचे आशिर्वीद घ्यायचा.

गणेशोत्सवामुळे सचिनचे सारे कुटुंबिय एकत्रित येतात. त्यामुळे त्यांच्यासाठी हा फार महत्वाचा क्षण असतो.

सिक्सर किंग युवराजच्या घरीही गणरायाचे आगमन झाले आहे.

युवराजच्या घरी एक बाल गणेशाची मुर्तीही तुम्हाला पाहायला मिळेल.

भारताचा माजी कर्णधार आणि प्रशिक्षक अनिल कुंबळेच्या घरीही गणपतीचे आगमन झाले आहे.

मुंबईकर श्रेयस अय्यरच्या घरीही गणपतीचे आगमन झाले आहे.