ओ नारी... मनहारी... सुकुमारी...; IPLच्या ग्लॅमरला 'चार चाँद' लावणाऱ्या 'पंचकन्या'

IPL 2021: आयपीएलमध्ये रोमहर्षक क्रिकेट सामन्यांचा थरार रंगतो. सोबतीला प्रेक्षकांच्या टाळ्या आणि शिट्ट्या, विविधरंगी पोशाखांत असलेले चाहते, वाद्यांची धून आणि चीअरलीडर्सचे थिरकणे ही मेजवानी असते.

आयपीएलमध्ये रोमहर्षक क्रिकेट सामन्यांचा थरार रंगतो. सोबतीला प्रेक्षकांच्या टाळ्या आणि शिट्ट्या, विविधरंगी पोशाखांत असलेले चाहते, वाद्यांची धून आणि चीअरलीडर्सचे थिरकणे ही मेजवानी असते. याशिवाय खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या पत्नी आणि प्रेयसीदेखील मैदानावर हजेरी लावतात. आयपीएल फ्रँचायजी मालकांपैकी शाहरूख खान, प्रीती झिंटा, जुही चावला मिस्ट्री गर्ल काव्या मारन हे चेहरेदेखील आकर्षण ठरले आहेत.

‘केकेआर’ची सहमालकीण असलेली अभिनेत्री जुही चावला अधूनमधून आयपीएल सामन्यांना हजेरी लावते. उद्याेगपती जय मेहता यांची ती पत्नी आहे. जुहीने २०२०च्या आयपीएल लिलावासाठी मुलगी जान्हवी मेहता हिला पुढे केले होते.

अभिनेत्री प्रीती झिंटा ही पंजाब किंग्स संघाची मालकीण आहे. पंजाबच्या सामन्यादरम्यान प्रीती झिंटाची नेहमी उपस्थिती असते. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यात आणि त्यांचे कौतुक करण्यात ती आघाडीवर असते. चित्रपटात काम करण्याकडे प्रीती झिंटाने पाठ फिरविली आहे. सध्या ती पंजाब संघाकडे पूर्ण लक्ष देत आहे.

काव्या ही सनरायजर्स हैदराबाद संघाची सीईओ आहे. कलानिधी मारन यांची ही कन्या काव्या आयपीएलमध्ये ‘मिस्ट्री गर्ल’ नावाने परिचित आहे. प्रत्येक सामन्यानंतर ट्विटच्या माध्यमातून भाष्य करीत असते. सामन्यादरम्यानचे चढउतार अनुभवताना काव्याच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहण्यासारखे असतात. अनेकदा ती भावुक झालेली दिसली. यामुळे चाहते काव्याला ट्रोलदेखील करतात.

चेन्नई सुपरकिंग्सच्या सामन्यादरम्यान महेंद्रसिंग धोनीची पत्नी साक्षीची उपस्थिती असतेच. पतीला पाठिंबा देण्यासाठी आपण नेहमी मैदानावर असतो, असे तिने वारंवार सांगितले आहे. साक्षीला माध्यमांमध्ये चर्चेत राहणे आवडते. साक्षी विविधरंगी गॉगल घालून हजेरी लावत असल्याने कॅमेऱ्याचे लक्ष वेधून घेते.

कर्णधार विराट कोहलीची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा यूएईतील आयपीएल सामन्यादरम्यान आकर्षण ठरली. आरसीबीच्या सामन्यात विराट मैदानावर असला की अनुष्काकडे हातवारे करताना दोघेही कॅमेऱ्यात येतात. विराटची काळजी घेण्यासाठी अनुष्काने अभिनयाला तात्पुरती विश्रांती देत कोरोना काळात नेहमी संघासोबत राहण्यास पसंती दिली. नुकतीच ती दुबईतून मुंबईत परतल्याचे वृत्त आहे.

Read in English