लग्नाआधी 'हे' क्रिकेटपटू झाले बाप, दोन भारतीयांचा समावेश; MS Dhoniचा खास माणूस अजूनही अविवाहित

भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने अलीकडेच पत्नी नताशा स्टॅनकोव्हिचसोबत पुन्हा विवाह केला. या दोघांनी २०२० च्या सुरुवातीला लॉकडाऊनमध्ये कोर्ट मॅरेज केले होते. हार्दिक आणि नताशा लग्नाआधी रिलेशनशिपमध्ये होते आणि त्याच दरम्यान नताशा गरोदर राहिली. असे अनेक क्रिकेटर्स आहेत जे लग्नाशिवाय वडील झाले आहेत.

वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार व्हिव्ह रिचर्ड्स हा त्याच्या काळातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक होते. १९८० च्या भारत दौऱ्यात त्यांनी बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता यांची भेट घेतली. दोघांनी एकमेकांना डेट केले. दोघे लिव्ह-इनमध्ये राहत असल्याच्या बातम्या आल्या होत्या.दरम्यान नीना गरोदर राहिली. १९८९ मध्ये तिने एका मुलीला जन्म दिला, तिचे नाव मसाबा आहे. यापूर्वी रिचर्ड्सचा विवाह मेरीशी झाला होता. नीनाने मसाबाला एकटीने वाढवले.

वेस्ट इंडिजचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्होच्या दोन मैत्रिणी आहेत. ब्राव्होला दोन्ही मैत्रिणींपासून ३ मुले आहेत. ब्राव्होने कोणत्याही मैत्रिणीशी लग्न केलेले नाही.

हार्दिक पांड्या आणि सर्बियन मॉडेल नताशा स्टॅनकोविक यांनी जानेवारी २०२० मध्ये कोर्ट मॅरेज केले. त्या वर्षी मे महिन्यात हार्दिकने नताशाच्या गरोदरपणाची घोषणा केली होती. त्यांना अगस्त्या नावाचा मुलगा आहे आणि या दोघांनी मागील महिन्यात पुन्हा लग्न केलं.

ऑस्ट्रेलियाचा स्फोटक सलामीवीर डेव्हिड वॉर्नरही २०१४ साली बाप झाला होता. त्याची जोडीदार कँडिसने आयव्ही मे नावाच्या मुलीला जन्म दिला. वॉर्नर आणि कँडिसने २०१५ मध्ये लग्न केले होते. दोघांना एकूण ३ मुली आहेत.

भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज विनोद कांबळी देखील लग्नाशिवाय वडील झाला. कांबळीने त्याची पहिली पत्नी नोएल लुईसपासून घटस्फोट घेतल्यानंतर, फॅशन मॉडेल अँड्रिया हेविटला डेट करण्यास सुरुवात केली. दोघेही बराच काळ रिलेशनशिपमध्ये राहिले. रिलेशनशिपमध्ये असताना अँड्रियाने मुलाला जन्म दिला. चार वर्षांनंतर दोघांचे लग्न झाले.

इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूट वडील झाल्यानंतर आपल्या जोडीदाराशी लग्न केले. रूटने २०१८ मध्ये भारताचा दौरा केला नव्हता, कारण तेव्हा त्याची जोडीदार कॅरोलिन कॉट्रेल आई होणार होती. २०१६ मध्ये दोघांनी एंगेजमेंट केली होती. एका मुलाचा बाप झाल्यानंतर रूट आणि कॉट्रेलने लग्न केले.