महिला खेळाडूने कमाईच्या बाबतीत विराटला टाकलं मागे; आशिया खंडात ठरली 'नंबर 1'

नव्या यादीत तिने २० वे स्थान पटकावले तर विराटने...

Virat Kohli Naomi Osaka, Top 100 Top 100 highest-paid athletes: भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली हा सध्याच्या घडीला आशिया खंडातील सर्वाधिक कमाई करणारा क्रिकेटपटू आहे.

मात्र नुकत्याच घोषित झालेल्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या आशियाई क्रीडापटूमध्ये विराटला एका महिलेने मात दिली आहे.

स्पोर्टीकोच्या अहवालानुसार, यंदाच्या Top 100 सर्वाधिक कमाई करणाऱ्या क्रीडापटूमध्ये केवळ 2 आशियाई खेळाडूंचा समावेश झाला आहे.

या यादीवर अमेरिकन आणि युरोपियन खेळाडूंचे वर्चस्व आहे. यादीत विराटला जपानची टेनिसपटू नाओमी ओसाका (Naomi Oskaka) ने मात दिली आहे. विराट कोहली यादीत ६१व्या स्थानी आहे तर नाओमीने २०वा क्रमांक पटकावला आहे.

२५ वर्षीय नाओमीची वार्षिक कमाई ५३.२ मिलियन डॉलर्स इतकी आहे. त्यातील १.२ मिलियन डॉलर्स हे विविध स्पर्धा जिंकून मिळालेले आहेत. तर तब्बल ५२ मिलियन डॉलर्स ही तिची विविध उत्पादनांच्या जाहीरातींमधील कमाई आहे.

विराट कोहलीबाबत बोलायचे झाल्यास, त्याची एकूण वार्षिक कमाई ३३ मिलियन डॉलर्स आहे. त्यातील २.९ मिलियन डॉलर्स हे टीम इंडिया आणि RCB कडून मिळाणारे मानधन आहे. तर जाहिरातीच्या उत्पन्नातून विराटने वर्षभरात ३१ मिलियन डॉलर्सची कमाई केली आहे.