Stuart Broad-Mollie king: लग्न न करताच स्टार क्रिकेटरच्या घरात हलला 'पाळणा'; बाप झाल्याचा 'आनंद' केला शेअर

इंग्लंडच्या संघाचा स्टार वेगवान गोलंदाज बाप झाला आहे. खरं तर 36 वर्षीय खेळाडूने लग्न न करताच बाळाला जन्म दिला आहे.

इंग्लंडच्या संघाचा स्टार गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडची गर्लफ्रेंड मोली किंग हिने मुलीला जन्म दिला आहे. ब्रॉडने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंवरून याबाबतची माहिती दिली. त्याने चिमुकल्या मुलीचे दोन फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. पहिल्या फोटोत मोली किंग तिच्या मुलीकडे पाहताना दिसत आहे.

स्टुअर्ट ब्रॉडने शेअर केलेल्या दुसऱ्या फोटोत त्याने स्वत: त्याच्या मुलीला हातावर घेतले आहे. ब्रॉडने मुलीसोबत बीचवर फोटो काढले आहेत.

स्टुअर्ट ब्रॉडने मुलीच्या नावाचा देखील खुलासा केला आहे. त्याच्या मुलीचे नाव ॲनाबेला ब्रॉड (Annabella Broad) असे ठेवले आहे. ब्रॉड आणि मॉली पालक बनल्यानंतर सोशल मीडियावरून या चाहते या जोडप्याचे अभिनंदन करत आहेत.

कसोटी क्रिकेटमध्ये 566 बळी पटकावणाऱ्या ब्रॉडने जूनमध्येच आपण बाप बनणार असल्याची माहिती दिली होती. जूनमध्ये त्याने त्याचा 36वा जन्मदिन साजरा करताना आपल्या घरी चिमुकल्याचे आगमन होणार असल्याचे म्हटले होते.

स्टुअर्ट ब्रॉडने यावर्षी 23 जून रोजी इंस्टाग्रामवर एक अतिशय सुंदर फोटो शेअर केला होता. फोटोमध्ये ब्रॉडची गर्लफ्रेंड मोली किंग बेबी बंपसोबत उभी असल्याचे दिसत आहे. ब्रॉडने गुडघ्यावर बसून मॉलीच्या बेबी बंपचे चुंबन घेतल्याचा फोटो शेअर केला होता.

स्टुअर्ट ब्रॉड हा जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे. तर मॉली किंग ही एक रेडिओ प्रेझेंटर आहे. दोघांनाही मागील वर्षी लग्न करायचे होते, पण काही कारणास्तव ते पुढे ढकलावे लागले होते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, स्टुअर्ट ब्रॉड आणि मॉली किंग 2012 पासून एकमेकांना डेट करत आहेत. स्टुअर्ट ब्रॉड पाकिस्तान दौऱ्यावर इंग्लंडकडून 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेत खेळताना दिसणार आहे.

स्टुअर्ट ब्रॉडने 159 कसोटी सामन्यात एकूण 566 बळी घेतले आहेत. ब्रॉडच्या नावावर 121 वनडे सामन्यांमध्ये 178 बळींची नोंद आहे, तर 56 ट्वेंटी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याने 65 बळी घेतले आहेत. मात्र ब्रॉड आता फक्त कसोटी क्रिकेट खेळतो.