Cricket Buzz»फोटो गॅलरी »ENG v PAK : पाकिस्तानी क्रिकेटपटूंची राहण्यासाठी सोय फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये नाही तर...ENG v PAK : पाकिस्तानी क्रिकेटपटूंची राहण्यासाठी सोय फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये नाही तर... By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 10:39 AMOpen in App1 / 11पाकिस्तानचा क्रिकेट संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला आहे आणि तिथे त्यांना एकामागोमाग अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.2 / 11इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तान संघाला स्पॉन्सर मिळेनासा झालाय आणि त्यामुळे त्यांना आपल्या जर्सीवर शाहिद आफ्रिदी फाऊंडेशनचा लोगो लावण्याची वेळ आली आहे. 3 / 11पाकिस्तानचा संघ येथे तीन कसोटी व तीन ट्ंवेटी-20 सामने खेळणार आहे, परंतु हे सामने पाकिस्तानात दाखवले जाणार नाही.4 / 11पाकिस्तानमधील स्थानिक ब्रॉडकास्टर पीटीव्हीनं या मालिकेचे सामने दाखवण्यासाठी इंटरनॅशनल ब्रॉडकास्टरकडून आकारली जाणारी रक्कम देण्याइतके पैसे नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे पाकिस्तानात ही मालिका प्रक्षेपित होऊ शकणार नाही. 5 / 11पीटीव्ही हे सरकारी नेटवर्क आहे. हे नेटवर्क पाकिस्तानच्या क्रिकेट सामन्यांचे थेट प्रक्षेपण दाखवते. पण, त्यासाठीची लिंक इंटनॅशनल ब्रॉडकास्टर्सकडून खरेदी केली जाते. त्याबदल्यात पीटीव्हीला काही रक्कम इंटनॅशनल ब्रॉडकास्टर्सना द्यावी लागते. 6 / 11सध्या पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती खालावली आहे आणि तिच अवस्था पीटीव्हीचीही आहे. त्यामुळे इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तानच्या सामन्यांसाठी त्यांच्याकडे पैसेच उरलेले नाहीत. 7 / 11केवळ याच मालिकेसाठीचे पैसे त्यांना द्यायचे नाहीत, तर यापूर्वीच्या मालिकेचे पैसेही त्यांनी अजून दिलेले नाहीत. त्यामुळे हे कर्ज फेडत नाही, तोपर्यंत इंटरनॅशनल ब्रॉडकास्टर पाकिस्तानच्या सामन्याची लिंक पीटीव्हीला देणार नाहीत. 8 / 11आता पीटीव्हीनं पाकिस्तान क्रिकेट मंडळाकडे ( पीसीबी) मदत मागितली आहे. पीसीबीनंही त्यांना स्वतःची समस्या स्वतः सोडवण्यास सांगून हात झटकले आहेत. 9 / 11त्यात आता त्यांना पुढील काही आठवडे एका ट्रॅव्हेल लॉजमध्ये रहावे लागणार आहे. पाकिस्तानातील एका पत्रकारानं ही माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे.10 / 1111 / 11 आणखी वाचा Subscribe to Notifications