Rohit Sharma: मुंबई इंडियन्सची IPLमधून लवकर एक्झिट, टीम इंडियातून विश्रांती, सुट्टी एन्जॉय करण्यासाठी रोहित शर्मा मालदीवमध्ये, शेअर केले खास फोटो

Rohit Sharma in Maldives: मुंबई इंडियन्सने आयपीएलमधून लवकर गाशा गुंडाळल्याने भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा यावेळी लवकर फ्री झाला आहे. मुंबईची या आयपीएलमधील कामगिरी अत्यंत निराशाजनक झाली. तसेच संघाला शेवटच्या स्थानावर समाधान मानावे लागले. दरम्यान, सध्या रोहित शर्मा सुट्टी एन्जॉय करण्यासाठी आपल्या कुटुंबासह मालदीवमध्ये दाखल झाला आहे.

मुंबई इंडियन्सने आयपीएलमधून लवकर गाशा गुंडाळल्याने भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा यावेळी लवकर फ्री झाला आहे. मुंबईची या आयपीएलमधील कामगिरी अत्यंत निराशाजनक झाली. तसेच संघाला शेवटच्या स्थानावर समाधान मानावे लागले. दरम्यान, सध्या रोहित शर्मा सुट्टी एन्जॉय करण्यासाठी आपल्या कुटुंबासह मालदीवमध्ये दाखल झाला आहे.

रोहित शर्माने मालदीवमधील काही सुंदर फोटो त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. रोहितने तो ज्या रिसॉर्टमध्ये थांबला आहे, त्याचेही फोटो शेअर केले आहेत.

रोहित शर्मा बरोबरच त्याची पत्नी रितीका हिनेही इन्स्टाग्रामवर या टूरचे फोटो शेअर केले आहेत. त्यामध्ये रोहित आणि कंपनी सुट्टी एन्जॉय करताना दिसत आहे.

रोहित शर्माने आयपीएलनंतर काही दिवसांचा ब्रेक घेतला आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी त्याचा संघात समावेश करण्यात आलेला नाही. रोहितऐवजी लोकेश राहुल टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. मात्र रोहित शर्मा इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून भारतीय संघात पुनरागमन करेल.

रोहित शर्माच्या २०२२मधील कामगिरीचा विचार केल्यास त्याने निराशा केली आहे. रोहित शर्माला १४ सामन्यात केवळ २६८ धावाच काढता आल्या आहेत.

संपूर्ण हंगामात रोहित शर्माला एकही अर्धशतक फटकावता आलं नाही आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं आहे. तसेच रोहित शर्माला केवळ दुसऱ्यांदा संपूर्ण हंगामात मिळून ३०० धावांचा टप्पा ओलांडता आलेला नाही.

मुंबई इंडियन्सने आयपीएलमध्ये १४ सामन्यांपैकी केवळ ४ सामन्यात विजय मिळवला. तर १० सामन्यात त्यांना पराभूत व्हावे लागले. एका हंगामात एवढे सामने गमावण्याची मुंबईची ही पहिलीच वेळ ठरली.

आयपीएलमध्ये रोहित शर्मा आणि मुंबई इंडियन्सला सपोर्ट करण्यासाठी रितिका नेहमीच उपस्थित असायची