ड्वेन ब्राव्हो बनला न्हावी, मोनू सिंगला दिला नवा लूक

चेन्नई सुपर किंग्सचा प्रमुख अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्हो दुखापतीमुळे दोन आठवडे क्रिकेटपासून दूर आहे.

इंडियन प्रीमिअर लीगमध्ये चेन्नईचा संघ 4 विजयासह गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे.

मंगळवारी त्यांना कोलकाता नाइट रायडर्सचा सामना करावा लागणार आहे. याही सामन्यात ब्राव्हो खेळू शकणार नाही, परंतु त्याने पडद्यामागे राहून सहकाऱ्यांना मदत केली आहे.

ब्राव्हो सहकारी खेळाडूंचे मनोबल वाढवण्याचे प्रयत्न करत आहे. त्यासाठी तो चक्क न्हावीच्या भूमिकेत गेला आहे. सामन्यापूर्वी त्याने मोनू सिंगच्या दाढीला नवा लुक दिला.