दुखापतीनंतरही मैदानात उतरलेले हे योद्धे तुम्हाला माहिती आहेत का...

सचिन तेंडुलकर सचिनला टेनिस एल्बोची गंभीर दुखापत झाली होती. त्याहा हातात बॅटही पकडता येत नव्हती. पण या दुखापतीतून तो सावरला. यानंतर मैदानात पुनरागमन करताना त्याने श्रीलंकेविरुद्ध शतक झळकावले होते. हे त्याचे 35वे शतक होते.

युवराज सिंग युवराजला 2011चा विश्वचषक सुरु असताना कॅन्सर झाला होता. पण या विश्वचषकात दमदार कामगिरी करत तो जगातला सर्वोत्तम खेळाडू ठरला होता.

अनिल कुंबळे वेस्ट इंडिजच्या एका दौऱ्यात कुंबळेच्या जबड्याला दुखापत झाली होती. पण दुखापतीनंतरही जबड्याला बँडेज बांधून खेळला होता.

झहीर खान झहीरला 2004-05 या मोसमात गंभीर दुखापत झाली होती. पण यानंतर मैदानात परतल्यावर त्याने 28 सामन्यांत 49 बळी मिळवले होते.

मोहम्मद शमी शमीने 2015च्या विश्वचषकात दमदार कामगिरी केली होती. त्यानंतर त्याला गुडघ्याची दुखापत झाली. पण दुखापतीनंतर मैदानात आल्यावर त्याने 10 कसोटी सामन्यांमध्ये 29 बळी मिळवले होते.