Ranji Trophy स्पर्धेत १४ व्या वर्षी मिळालं प्रमोशन; आता वैभव सूर्यवंशीला किती पगार मिळणार?

इथं जाणून घेऊयात यंदाच्या रणजी हंगामात मिळालेल्या बढतीसह त्याला पगार किती मिळणार त्यासंदर्भातील खास स्टोरी

भारतीय क्रिकेट जगतात वैभव सूर्यवंशी हे नाव सातत्याने चर्चेत आहे. रणजी स्पर्धेत मैदानात उतरण्याआधीच त्याच्या नावे आणखी एका खास विक्रमाची नोंद झाली.

दोन वर्षांपूर्वी १२ वर्षे आणि २८४ वय असताना रणजी पदार्पण करणाऱ्या वैभव सूर्यंवशी याच्याकडे यंदाच्या हंगामात बिहारच्या उप कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

वैभव सूर्यवंशी हा रणजी करंडक स्पर्धेच्या आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात युवा उप-कर्णधार ठरला आहे. इथं जाणून घेऊयात यंदाच्या हंगामात मिळालेल्या बढतीसह त्याला पगार किती मिळणार त्यासंदर्भातील खास स्टोरी

भारताच्या युवा डावखुऱ्या बॅटरला तसा IPL मध्ये 'करोडपती'चा टॅग लागला. आता वेगवेगळ्या स्पर्धेच्या माध्यमातून तो चांगली कमाई करताना दिसतोय.

IPL मधील धमाकेदार कामगिरीनंतर भारतीय 'अ' संघासह १९ वर्षांखालील संघात पदार्पणाची संधी मिळाल्यावर त्याच्या कमाईत वाढ झाली. आता त्यात रणजी करंडक स्पर्धेतील मोठ्या कमाईची भर पडली आहे.

रणजी करंडक स्पर्धेत अनुभवानुसार मानधन दिले जाते. ०-२० सामन्यांचा अनुभव असणाऱ्या खेळाडूंना प्रत्येक दिवसासाठी ४० हजार रुपये मानधन दिले जाते. त्यानुसार, सहावा रणजी सामना खेळणारा १४ वर्षीय वैभव सूर्यंवशी प्रत्येक सामन्यात ४० हजार रुपये कमाई करेल.

बाद फेरीतील लढती आधी सर्व सामने हे चार दिवसीय असतात. त्यामुळे एका सामन्यात वैभव सूर्यंवशी जवळपास १ लाख ६० हजार रुपये कमाई करेल.

वैभव सूर्यवंशी हा सध्या कमालीच्या फॉर्ममध्ये आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याने विक्रमांची बरसात केल्याचे पाहायला मिळाले. पण रणजी करंडक स्पर्धेतील अरुणाचल प्रदेश विरुद्धच्या सामन्यात तो फुसका बार ठल्याचे पाहायला मिळाले.

बिहारच्या डावाची सुरुवात करताना त्याने ५ चेंडूत २ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने १४ धावा केल्या. नुसती हाणामारी पॅटर्नमुळे एका षटक खेळण्याच्या आतच तोबोल्ड होऊन तंबूत परतला.