पृथ्वी शॉ बाद झाला, पण विकेट पडली नेटिझन्सची; SRHला चिअर करण्यासाठी 'ती' दुबईत पोहोचली!

सलग दोन विजयामुळे आत्मविश्वास उंचावलेला दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals) संघाने Indian Premier League ( IPL 2020) मध्ये आजच्या सामन्यात चांगली कामगिरी केली. सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad ) संघाच्या धावगतीवर त्यांनी वेसण घातले.

डेव्हिड वॉर्नरनं ( David Warner) नेतृत्वाखालील SRH संघाला 20 षटकांत 4 बाद 162 धावा करता आल्या. जॉनी बेअरस्टो ( Jonny Bairstow) आणि केन विलियम्सन ( Kane Williamson ) यांनी दमदार खेळ केला.

दिल्ली कॅपिटल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. वॉर्नरने 33 चेंडूंत 3 चौकार 2 षटकारांसह 45 धावा केल्या. बेअरस्टो 48 चेंडूंत 2 चौकार व 1 षटकारासह 53 धावा करून माघारी परतला.

केननंही 26 चेंडूंत 5 चौकारांसह 41 धावा केल्या. सनरायझर्स हैदराबादनं ( SRH) 20 षटकांत 4 बाद 162 धावा केल्या. दिल्ली कॅपिटल्सच्या अमित मिश्रा आणि कागिसो रबाडा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. कागिसोनं या कामगिरीसह IPLमध्ये भल्याभल्या दिग्गजांना न जमलेला पराक्रम केला.

लक्ष्याचा पाठलाग करताना DCचा सलामीवीर पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) 2 धावांवर पहिल्याच षटकात माघारी परतला. भुवनेश्वर कुमारनं त्याला बाद केलं. शिखर धवन ( 34), रिषभ पंत ( 28) आणि शिमरोन हेटमायर ( 21) यांनी संघर्ष केला, परंतु त्यांना अपयश आलं. दिल्लीला 7 बाद 147 धावा करता आल्या. हैदराबादनं 15 धावांनी सामना जिंकला.

रशीदनं 4 षटकांत 14 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. आयपीएलमधील त्याची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली.

भुवनेश्वर कुमारनं ( Bhuvneshwar Kumar) पहिल्या षटकात सापळा रचून पृथ्वीला बाद केलं. पृथ्वी बाद होताच SRHच्या चाहत्यांमध्ये ती दिसली आणि सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळल्या.

ती म्हणजे सनरायझर्स हैदराबाद संघाचे मालक कलानिधि मारन यांची मुलगी काव्या मारन. काव्या सनरायझर्य हैदराबाद संघाची सहमालक देखील आहे.