गेलपासून केएलपर्यंत हे क्रिकेटर्स ठेवतात अनोखी हेअरस्टाइल

केसांची वेगवेगळ्या पद्धतीची हेअरस्टाइल ठेवण्याची एक क्रेझ आहे. बॉलिवूडपासून क्रिकेटजगतातील अनेक खेळाडू हटके हेअरस्टाइल ठेवतात. जगभरात अशी वेगळी हेअरस्टाइल ठेवणाऱ्या क्रिकेटर्सची यादी मोठी आहे.

वेस्ट इंडिजचा धडाकेबाज सलामीवीर ख्रिस गेल बऱ्याचदा केसांच्या वेगवेगळ्या अवतारात पाहायला मिळतो.

ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू अँड्यू सायमंड्सही अनोख्या हेअरस्ट्राइलसाठी चर्चेत होता. लांबलचक केस असलेल्या अँड्यूची मैदानावरील एन्ट्री आजही त्याच्या चाहत्यांच्या स्मरणात आहे.

भारताचा अष्टपैलू क्रिकेटर्स हार्दिक पांड्याचीही हेअरस्टाइल हटके आहे. हार्दिक पांड्या हा अनेकदा सामन्यांत केसांच्या वेगवेगळ्या हेअरस्टाइल ठेवत असतो.

श्रीलंकेचा लसिथ मलिंगाही वेगळ्या धाटणीच्या हेअरस्टाइलसाठी जगभरात प्रसिद्ध आहे.

इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केविन पीटरसन याची हेअरस्टाइल थोडी वेगळी आहे. परंतु एकेकाळी त्याच्यासारखी हेअरस्टाइल ठेवण्याचा क्रेझ होता.

वेस्ट इंडिजचा क्रिकेटर सुनील नरेनही तारे जमीन पर चित्रपट पाहिल्यानंतर तशा प्रकारची हेअरस्टाइल ठेवली होती.

टीम इंडियाचा क्रिकेटपटू केएल राहुल जगभरात स्टायलिश क्रिकेटर्स म्हणून प्रसिद्ध आहे. त्याचं एक कारण म्हणजे त्याची हेअरस्टाइल आहे.