Join us  

क्रिकेटपटूंची हेअरस्टाईल

By admin | Published: March 09, 2015 12:00 AM

Open in App

श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लासीथ मलिंगाची हेअरस्टाईल नेहमीप्रमाणेच असली तरी मैदानावर त्याच्या गोलंदाजीपेक्षा केशरचनेची चर्चा जास्त रंगते.

वेगवान चेंडूने विरोधी संघातील फलंदाजांची झोप उडवणारा दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज डेल स्टेन आफ्रिकेतील फॅशन आयकॉन म्हणून प्रसिद्ध आहे. वर्ल्डकपसाठी डेल स्टेनने त्याच्या प्रेयसीच्या सल्ल्यानुसार ही केशरचना केली आहे.

बांग्लादेशचा क्रिकेटपटू शाकीब उल हसन हा त्यांच्या संघातील सर्वात स्टायलिस्ट क्रिकेटपटू म्हणून प्रसिद्ध आहे. ही इमेज जपत शाकीबने वर्ल्डकपसाठी ही नवीन केशरचना केली.

ख्रिस्तियानो रोनाल्डोची जादू पाकिस्तानचा फलंदाज उमरान अकमलवरही दिसते. अकमलनेही रोनाल्डोसारखी केशरचना केली आहे.

भारताचा सलामीवीर व पिळदार मिशीसाठी ओळखला जाणाला शिखर धवनने वर्ल्डकपमसाठी बारीक केस कापून घेतले आहे. शिखरची हेअरस्टाईल आमीर खानच्या गजनी चित्रपटाप्रमाणे असल्याचे काही जणांना वाटते.

भारताचा आक्रमक फलंदाज विराट कोहलीची हेअर स्टाईलही क्रिकेट प्रेमींचे लक्ष वेधणारी ठरते. फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोपासून प्रेरणा घेत कोहलीने ही हेअरस्टाईल केल्याची चर्चा आहे.

क्रिकेटच्या मैदानात वर्ल्डकपचा थरार रंगात आला असला तरी मैदानाबाहेर खेळाडूंच्या स्टाईलची चर्चा रंगलेली असते. वर्ल्डकपच्या तयारीत असतानाही खेळाडूंनी त्यांच्या स्टाईल स्टेटमेंटकडे दुर्लक्ष केलेले नाही. वर्ल्डकपमध्ये वेस्ट इंडिजचा खेळाडू अँड्रे रसेलच्या हेअरस्टाईल सर्वांचेच लक्ष वेधते.