लाईफ झिंगालाला... क्रिकेट सामन्यांनी 'या' मुलींना बनवलं रातोरात स्टार!

भारतात क्रिकेट हा एखाद्या सणाप्रमाणे साजरा केला जातो. त्यात इंडियन प्रीमिअर लीगनं ( आयपीएल ) जगभरातील क्रिकेटचाहत्यांना वेड लावलं आहे. क्रिकेटनं केवळ खेळाडूंनाच नव्हे तर प्रेक्षकांनाही फेमस बनवलं आहे. यामध्ये महिला फॅन्सची तर चलती आहे. अशाच महिला प्रेक्षक रातोरात फेमस झाल्या आहेत.

मालती चहर हिचा फोटो इंडियन प्रीमिअर लीग दरम्यान तुफान व्हायरल झाला होता. चेन्नई सुपर किंग्सच्या सामन्यात कॅमेरामननं तिला टिपले आणि त्यानंतर सोशल मीडियावर तिचा शोध सुरू झाला.

बऱ्याच वेळानंतर हे माहीत पडले की ती गोलंदाज दीपक चहरची बहीण आहे.

त्यानंतर सोशल मीडियावर तिच्या फॉलोअर्सची संख्या झपाट्यानं वाढली. इतकेच नाही तर महेंद्रसिंग धोनीसोबतचा तिचा फोटोही प्रचंड व्हायरल झाला होता. मालती ही एक अभिनेत्रीही आहे.

2019च्या आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाच्या सपोर्ट स्टाफमध्ये एक मुलगी सतत दिसायची.

लाईव्ह टिव्हीवर जेव्हा तिला दाखवण्यात आले तेव्हा सोशल मीडियावर तिचा शोध सुरू झाला.

काव्या मारन असं या मुलीचं नाव आहे. ती सनरायझर्स संघाची सहमालकिण आहे. सन नेटवर्कचे फाऊंडर कलानिथी मारन यांची ती मुलगी.

2018च्या आशिया कप स्पर्धेत पाकिस्तानी मुलगी फेमस झाली. रिजला रेहान असं त्या मुलीचं नाव आणि ती दुबईत राहते. आशिया कप स्पर्धेत भारत-पाकिस्तान सामन्यानंतर तिचे फोटो व्हायरल झाले होते.

तिचे फॉलोअर्स एवढे वाढले की तिनं सोशल मीडियावरील नाव thatpakistanifan असं ठेवलं होतं.

2019च्या वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यानही ती पाकिस्तान संघाला सपोर्ट करायला पोहोचली होती. तिला टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आवडतो.

आयपीएल 2019मध्ये मुंबई इंडियन्सच्या सामन्यात आदिती हंडिया हीचे फोटो व्हायरल झाले होते.

गतवर्षी आयपीएल फायनलमध्ये ती वानखेडे स्टेडियमवर दिसली होती.

आदिती हंडिया 2018ची मिस डिव्हा आहे आणि ती मुंबई इंडियन्सचा खेळाडू ईशान किशनची मैत्रीण आहे.