Shahid Afridi vs Jay Shah : शाहिद आफ्रिदाचा जळफळाट; जय शाह यांच्या आयपीएल विस्ताराच्या इराद्यावर मोठं भाष्य!

Shahid Afridi vs Jay Shah : इंडियन प्रीमिअर लीग ही जगातील सर्वोत्तम व श्रीमंत ट्वेंटी-२० लीग आहे. इंडियन प्रीमिअर लीग २०२३ ते २०२७ या पाच वर्षांसाठी नुकत्याच झालेल्या प्रसारण हक्क ई लिलावत सर्व रेकॉर्ड मोडले गेले.

इंडियन प्रीमिअर लीग ही जगातील सर्वोत्तम व श्रीमंत ट्वेंटी-२० लीग आहे. इंडियन प्रीमिअर लीग २०२३ ते २०२७ या पाच वर्षांसाठी नुकत्याच झालेल्या प्रसारण हक्क ई लिलावत सर्व रेकॉर्ड मोडले गेले. स्टार स्टोर्ट्स, व्हायकोम १८ आदींनी एकूण ४८,३९० कोटींची बोली लावली. त्यामुळे आयपीएलच्या एका सामन्यासाठी BCCI ला ११८ कोटी रुपये मिळणार आहेत.

आयपीएल २०२२पासून संघसंख्याही १० इतकी झाली आहे आणि त्यामुळे आगामी काळात सामन्यांची संख्याही वाढवण्याचे संकेत बीसीसीआय सचिव जय शाह यांनी दिले आहेत. त्यामुळे दोन महिन्यांऐवजी आता आयपीएल अडीच महिने खेळवली जाईल आणि त्यासाठी BCCI आयसीसीशी बोलणार आहे. पण, याला पाकिस्तानातून विरोध होताना दिसतोय. पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी ( Shahid Afridi) यानेही मोठं विधान केलं आहे.

अडीच महिने आयपीएल चालल्यास त्याचा फटका घरच्या मैदानावर होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटला बसेल, असे पाकिस्तानच्या खेळाडूंचे म्हणणे आहे. पाकिस्तानच्या खेळाडूंवर आयपीएल बंदी आहे. त्यात शाहिद आफ्रिदी म्हणाला,''आता सर्व बाजार व अर्थव्यवस्थेच्य अंतर्गत येते. भारत हे क्रिकेटचे मोठे मार्केट आहे. त्यामुळे ते जे म्हणतील तेच होईल.''

शाह यांच्या विधानानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्याने आक्षेप घेतला. राष्ट्रकुल स्पर्धेदरम्यान बर्मिंगहॅम येथे आयसीसीची बैठक पार पडणार आहे आणि त्यात या विषयावर चर्चा केली जाणार आहे. क्रिकेटमध्ये पैसा येणं चांगली गोष्ट आहे, परंतु आयपीएलसाठी प्रत्येक वर्षाला स्टार खेळाडूंना बुक करून ठेवण्याच्या बीसीसीआयच्या योजनेचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला फटका बसेल.