फिल ह्यूजेस या ऑस्ट्रेलियन सलामीवीराला २५ नोव्हेंबर २०१४ रोजी, सिडनी क्रिकेट ग्राउंडवर शेफील्ड शील्ड सामन्यादरम्यान, शॉन अॅबॉटचा बाउन्सर मानेवर लागला होता. चेंडू लागल्यावर तो जमिनीवर कोसळला आणि बेशुद्ध पडला. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली, परंतु तो बरा होऊ शकला नाही. दोन दिवसांनी ह्यूजेसचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.