उपहारापूर्वी शतक झळकावणारे फलंदाज

मुंबई : अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटीत भारताचा सलामीवीर शिखर धवनने खणखणीत शतक झळकाविले. पहिल्या दिवशीच उपहारापूर्वी शतक झळकावणारा धवन हा जगातील सहावा, तर पहिलाच भारतीय फलंदाज ठरला आहे. धवनने अवघ्या 87 चेंडूत शतक ठोकले आहे.

ऑस्ट्रेलियाचा फलंदाज डेव्हिड वॉर्नर याने पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यात कारकिर्दीतले 18वे शतक साजरे केले होते. यावेळी त्याने उपाहारापूर्वीच शतक ठोकले. वॉर्नरने 78 चेंडूंत केवळ 117 मिनिटांत 17 चौकारांसह शतक ठोकले होते.

सर डॉन ब्रॅडमन यांनी 87 वर्षांपूर्वी 1930 मध्ये आपल्या 334 धावांच्या खेळीत पहिले शतक उपाहारापूर्वी करताना 105 धावा केल्या होत्या.

सर डॉन ब्रॅडमन यांच्या पूर्वी 1902 मध्ये ऑस्ट्रेलियाच्याच व्हिक्‍टर ट्रम्पर यांनी मॅंचेस्टर येथे 103 धावा केल्या होत्या.

तर, ऑस्ट्रेलियाचे चार्ल्स मॅकार्टनी यांनी लीडसवर 1926 मध्ये 112 धावांची खेळी केली होती.

ऑस्ट्रेलियन फलंदाजांखेरीज पाकिस्तानचा फलंदाज माजिद खानने उपाहारापूर्वी शतक ठोकण्याची कामगिरी केली होती. त्यांनी 1976 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध 108 धावा केल्या होत्या.