बांग्लादेशला नमवत सेमीफायनलमध्ये धडक

बांग्लादेशच्या महमुद्दुल्लाहचा झेल शिखर धवनने सीमारेषेनजीक अत्यंत कुशलतेने पकडला आणि बांग्लादेशची अवस्था बिकट झाली.

इमरूल कायेस रविंद्र जाडेजाच्या चांगल्या क्षेत्ररक्षणामुळे धावचीत झाला. उमेश यादवने ही संधी दडवली नाही.

जाडेजाच्या गोलंदाजीवर झेल घेत शाकिब अल हसनला बाद केल्यानंतर मोहम्मद शामीचे कौतुक करताना कप्तान महेंद्रसिंग ढोणी.

शामीच्या गोलंदाजीवर सौम्य सरकारचा डावीकडे झेपावत अफलातून झेल पकडल्यावर जल्लोष करताना महेंद्रसिंग ढोणी.

उमेश यादवने बांग्लादेशला पहिला दणका दिला. तमिम इक्बाल धोणीकरवी झेलबाद झाल्यानंतर विराट कोहलीने असा जल्लोष केला.

गोलंदाजांच्या चिंधड्या उडवणारा विराट कोहलीला बाद केल्यानंतर बांग्लादेशचा गोलंदाज रुबेल होसेन खूश झाला होता.

सेट झाला असताना ३० धावांवर शिखर धवन बाद झाला. मुशाफिकर रहीमच्या गोलंदाजीवर धवन यष्टीचीत झाला.

मोठी खेळी खेळण्यात अपयश आलं तरी पहिल्या विकेटसाठी शिखर धवनने रोहीत शर्माला चांगली साथ दिली. एक चांगला फटका लगावताना धवन.

बांग्लादेशसमोर संयमाने फलंदाजी केलेल्या रोहीत शर्माने स्ट्रेट ड्राइव्हवर अत्यंत सुंदर षटकार लगावला.

अत्यंत मोक्याच्या वेळी रोहीत शर्माने शतक झळकावले आणि बांग्लादेशसमोर ३०२ धावांचे आव्हान ठेवण्यात मोलाची कामगिरी बजावली.

या सामन्यात चार विकेट घेणा-या उमेश यादवने शेवटची विकेट घेत बांग्लादेशला गुंडाळले आणि अजिंक्य रहाणेसोबत विजयाचा आनंद साजरा केला. भारताने १०९ धावांनी बांग्लादेशचा पराभव करत दिमाखात सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे.