अनुष्काच्या तालावर थिरकला विराट, पाहा व्हायरल फोटो

वेस्ट इंडिज दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाने बुधवारी तेथील उच्चायुक्तांच्या निवासस्थानी भेट दिली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) टीम इंडियाच्या सदस्यांचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला.

या फोटोत जरी कॅप्टन कोहलीची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा दिसत नसली, तरी ती तेथे उपस्थित होती.

विराट आणि अनुष्काचे फोटो सोशल मीडियावर आता व्हायरल होत आहे. या फोटोत कोहली आणि अनुष्का दोघेही हसताना दिसत आहेत. टीम इंडियाचे खेळाडूही विरुष्कामधील संवाद एंजॉय करत आहेत.

भारतीय संघाने ट्वेंटी-20 आणि वन डे मालिकेत विजय मिळवल्यानंतर कसोटी मालिकेकडे मोर्चा वळवला आहे. दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना जिंकून टीम इंडियाने 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा कसोटी सामना आजपासून किंग्स्टन येथे खेळवण्यात येणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाने कॅरेबियन बीचवर फेरफटका मारला होता.

यावेळी सोबत बॉलिवूड अभिनेत्री आणि कॅप्टन विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माही दिसली होती.

विराट आणि अनुष्काचे याआधीही विंडीजमधील भटकंतीचे काही फोटो व्हायरल झाले होते.