BCCI ने ज्यांना दुर्लक्षित केले, ते गाजवत आहेत IPL 2023; परफॉर्मन्समधून देत आहेत 'चपराक'!

आयपीएल २०२३ मध्ये दमदार कामगिरी करणारे खेळाडू लवकरच टीम इंडियाकडू खेळताना दिसू शकतात. ज्या खेळाडूंना BCCI आणि संघ व्यवस्थापनाने आतापर्यंत पुरेशी संधी दिली नाही किंवा दुर्लक्षित केले, तेच आयपीएल २०२३ गाजवताना दिसत आहेत आणि बीसीसीआयला परफॉर्मन्समधून चपकार देत आहेत.

ऋतुराज गायकवाड चेन्नई सुपर किंग्जकडून खेळतोय आणि त्याने आतापर्यंत ५ सामन्यांत ५० च्या सरासरीने २०० धावा केल्या आहेत आणि २ अर्धशतके ठोकली आहेत. ९२ धावा ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे.

चेन्नई सुपर किंग्सकडून आयपीएल २०२३ त खेळणारा अजिंक्य रहाणेचा फॉर्म सर्वांना अचंबित करणारा आहे. त्याने ३ सामन्यांत १९५ च्या स्ट्राईक रेटने १२९ धावा कुटल्या आहेत.

मुंबई इंडियन्सच्या तिलक वर्माने ४ सामन्यांत ५९ च्या सरासरीने १७७ धावा केल्या आहेत.

२८ वर्षीय अष्टपैलू व्यंकटेश अय्यर आयपीएल २०२३ मध्ये दमदार कामगिरी करत आहे आणि त्याने शतकही झळकावले आहे. त्याने पाच सामन्यांत ४७च्या सरासरीने २३४ धावा केल्या आहेत. त्याने एक शतक आणि २ अर्धशतकं झळकावली आहेत. १३७ धावा ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. त्याने १९ चौकार आणि १५ षटकार मारले आहेत.

शिखर धवन ट्वेंटी-२०, वन डे आणि कसोटी संघातून बराच काळ बाहेर आहे. आयपीएल २०२३ मध्ये त्याने आतापर्यंत त्याने ४ सामन्यांच्या ११७ च्या सरासरीने २३३ धावा केल्या आहे आणि त्यात २ अर्धशतकांचा समावेश आहे. त्यात त्याने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध नाबाद ९९ धावांची सर्वोत्तम खेळी केली आहे.

मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती २०२१ च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपासून भारतीय संघात स्थान मिळवू शकलेला नाही. आयपीएल २०२३ मध्ये त्याने आतापर्यंत ५ सामन्यांत ७ विकेट घेतल्या आहेत.

लेगस्पिनर रवी बिश्नोईनेही चांगली कामगिरी केली आहे. लखनौ सुपर जायंट्सकडून खेळताना त्याने ५ सामन्यात ८ बळी घेतले आहेत.

तुषार देशपांडे चेन्नई सुपर किंग्जकडून खेळत आहे. या २७ वर्षीय गोलंदाजाचे आंतरराष्ट्रीय पदार्पण अजून बाकी आहे. त्याने आतापर्यंत ५ सामन्यांत १० विकेट्स घेतल्या आहेत.