PHOTOS: IPL मध्ये सर्वाधिकवेळा सामना गाजवणारे 'वीर', रोहित शर्मा तिसऱ्या क्रमांकावर

IPL 2024 Updates: सध्या आयपीएलच्या सतराव्या हंगामाचा थरार रंगला आहे.

२००८ मध्ये सुरू झालेली इंडियन प्रीमिअर लीग आजच्या घडीला जगातील सर्वात लोकप्रिय लीग झाली आहे. आतापर्यंत या स्पर्धेचे १६ हंगाम झाले असून सध्या सतराव्या हंगामाचा थरार रंगला आहे.

आयपीएलमुळे परदेशी खेळाडूंसह युवा भारतीय खेळाडूंनी प्रसिद्धीचे शिखर गाठले. या स्पर्धेत अप्रतिम कामगिरी करून अनेकांनी आपल्या राष्ट्रीय संघात जागा मिळवली. चला तर मग जाणून घेऊया आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिकवेळा सामनावीर पुरस्कार पटकावणारे शिलेदार.

सर्वाधिकवेळा सामना गाजवणाऱ्यांच्या यादीत एबी डिव्हिलियर्स अव्वल स्थानी आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू मिस्टर ३६० रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाचा मोठ्या कालावधीपर्यंत भाग होता.

डिव्हिलियर्सने सर्वाधिक २५ वेळा सामनावीर पुरस्कार जिंकला आहे. तो आरसीबीशिवाय दिल्ली कॅपिटल्सच्या संघाचा भाग राहिला आहे.

आयपीएलच्या इतिहासातील सर्वात स्फोटक फलंदाज म्हणून ख्रिस गेलची नोंद आहे. त्याने आरसीबी, केकेआर आणि पंजाब किंग्जच्या संघाचे प्रतिनिधित्व करताना अनेक विक्रम केले.

आयपीएलमध्ये ख्रिस गेलने २२ वेळा सामनावीर पुरस्कार पटकावला आहे. त्याने एकाच सामन्यात सर्वाधिक १७५ धावा करण्याची किमया साधली होती.

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मा या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. रोहित शर्मा आयपीएलच्या इतिहासातील एक यशस्वी कर्णधार आहे.

रोहितने तब्बल १९ वेळा पुरस्कार जिंकला आहे. तो मुंबई इंडियन्सशिवाय डेक्कन चार्जर्सच्या संघाचा हिस्सा राहिला आहे.

ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू डेव्हिड वॉर्नर या यादीत चौथ्या स्थानावर आहे. वॉर्नरचा १८वेळा सामनावीर पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. तो दिल्ली कॅपिटल्सशिवाय सनरायझर्स हैदराबादसाठी खेळला आहे.

आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनी पाचव्या स्थानावर आहे. धोनीने १७ वेळा सामनावीर पुरस्कार जिंकण्याची किमया साधली. तो चेन्नई सुपर किंग्जशिवाय रायजिंग पुणे सुपर जायंट्सचा भाग राहिला आहे.