Pakistan Cricket Board to hire psychotherapist for players in New Zealand to alleviate the mental stress   | न्यूझीलंड दौऱ्यावर गेलेल्या खेळाडूंसाठी पाकिस्तान क्रिकेट मंडळ शोधतोय मानसोपचारतज्ञ

न्यूझीलंड दौऱ्यावर गेलेल्या खेळाडूंसाठी पाकिस्तान क्रिकेट मंडळ शोधतोय मानसोपचारतज्ञ

पाकिस्तानचे क्रिकेटपटू सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहेत. ५३ सदस्यांच्या संघातील ७ खेळाडूंचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आढळला. त्यानंतर वारंवार आयसोलेशन नियमांचं उल्लंघन केल्यामुळे न्यूझीलंड सरकरानं त्यांना फायनल वॉर्निंग दिली. पण, आता या खेळाडूंची तिसरी चाचणी निगेटिव्ह आली असून त्यांना सराव करण्याची परवानगी मिळाली आहे. पण, क्वारंटाईनमध्ये असलेल्या खेळाडू व सपोर्ट स्टाफचा मानसिक ताण कमी करण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट मंडळ ( PCB) मानसोपचारतज्ञ नेमणार आहे. PCB खेळाडूंसाठी ऑनलाईन सेशन घेणार असून त्यात मानसोपचारतज्ञ खेळाडूंशी संवाद साधणार आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार इंग्लंडमधील स्पेशालिस्टशी चर्चा सुरू होती, परंतु न्यूझीलंड व इंग्लंड यांच्यातील १३ तासांचा फरक असल्यानं तो पर्याय रद्द केला. स्थानिक तज्ञाचा शोध सुरू आहे.  


पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड वेळापत्रक
ट्वेंटी-२० मालिका
१८ डिसेंबर - ऑकलंड ( सकाळी ११.३० वा. पासून)
२० डिसेंबर - हॅमिल्टन ( सकाळी ११.३० वा.पासून)
२२ डिसेंबर - नेपियर ( सकाळी ११.३० वा. पासून) 
कसोटी मालिका
२६ ते ३० डिसेंबर - माऊंट मौनगानुई ( पहाटे ३.३० वा. पासून)
३ ते ७ जानेवारी २०२१ - ख्राईस्टचर्च (  पहाटे ३.३० वा. पासून)
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Pakistan Cricket Board to hire psychotherapist for players in New Zealand to alleviate the mental stress  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.