Join us  

इंग्लंड, अफगाणिस्तान संघाचे युवा खेळाडू लक्षवेधी ठरले

पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड हा दुसरा कसोटी सामना तीन दिवसांमध्ये संपला. विशेष म्हणजे या पराभवाने पाकिस्तानचे चाहते खूप निराश असतील, कारण पहिला सामना जिंकल्यानंतर दुसऱ्या सामन्यात त्यांचा संघ सपशेल ढेपाळला.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2018 2:44 AM

Open in App

- अयाझ मेमन(संपादकीय सल्लागार)पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड हा दुसरा कसोटी सामना तीन दिवसांमध्ये संपला. विशेष म्हणजे या पराभवाने पाकिस्तानचे चाहते खूप निराश असतील, कारण पहिला सामना जिंकल्यानंतर दुसऱ्या सामन्यात त्यांचा संघ सपशेल ढेपाळला.त्यामुळे ही मालिका अखेर १-१ अशी बरोबरीत सुटली. इंग्लंडच्या दोन नवख्या खेळाडूंनी लक्ष वेधले. पहिले म्हणजे डावखुरा वेगवान गोलंदाज सॅम कुर्रन आणि दुसरा डॉमनिक बेस जो आॅफ स्पिनर आणि डावखुरा फलंदाज आहे. हे दोघेही २० वर्षाहून कमी वयाचे आहेत. त्यात बेसने नुकताच वयाची विशी गाठली आहे.हे दोन्ही गोलंदाज भारताच्या जुलै महिन्यापासून सुरु होत असलेल्या इंग्लंड दौºयात भारतीय संघासाठी डोकेदुखी ठरु शकतात. त्यामुळे भारताला सांभाळून खेळावे लागेल. सॅम डावखुरा वेगवान गोलंदाज असून याचा इंग्लंडला मोठा फायदा होईल. कारण डावखुºया वेगवान गोलंदाजामुळे संघाच्या आक्रमकतेमध्ये विविधता येते. दुसरीकडे बेस म्हणजे इंग्लंड एक चांगल्या दर्जाचा फिरकीपटू मिळाला आहे. दुसºया कसोटीच्या दुसºया डावात त्याने पाकिस्तानच्या कसलेल्या फलंदाजांना आपल्या जाळ्यात अडकवले. या शिवाय त्याने फलंदाजीतही छाप पाडली.पहिल्या सामन्यात अर्धशतक झळकावल्यानंतर बेसने दुसºया डावात ४९ धावांवर बाद झाला .जेव्हा कधी युवा खेळाडू कसोटी क्रिकेटच्या उच्च स्तरावर असे प्रदर्शन करतात, तेव्हा त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवणे गरजेचे असते.दुसरीकडे आंतरराष्ट्रीय टी२० सामना झाला तो बांगलादेश व अफगाणिस्तान यांच्यामध्ये, जो डेहराडून येथे खेळविण्यात आला. या सामन्यात अफगाणिस्तानने बांगलादेशने ४५ धावांनी नमविले. आता ते भारताविरुद्ध कसोटी खेळून आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण करण्यास सज्ज झाले आहेत. पण माझ्या मते मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये अफगाणिस्तानचा संघ खूपच गुणवान संघ म्हणून पुढे येत आहे. शिवाय ते केवळ गुणवान नाही, तर एक मनोरंजक संघही आहेत. त्यांचा राशिद खान तर स्टार आहे. आधी आयपीएल गाजवल्यानंतर त्याने इंग्लंड येथे एका चॅरिटी सामन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध सामना खेळला. यानंतर पुन्हा भारतात परतल्यानंतर त्याने बांगलादेशविरुद्ध ३ बळी घेतले. एका आठवड्यात तीन सामने खेळणे खूप कठिण गोष्ट असून अफगाणिस्तानच्या खेळाडूंचा जोश कळून येतो.

टॅग्स :क्रिकेट