Join us  

होय, खेळपट्टीच्या अभ्यासाने बदलू शकते क्रिकेट सामन्याचे गणित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 4:09 PM

Open in App
ठळक मुद्देक्युरेटर म्हणजे खेळपट्टी बनविणारा अत्यंत महत्वाचा घटकअभ्यासाने बॉलर, स्पिनर किंवा बॅटींगसाठी उपयुक्त खेळपट्टी बनविता येऊ शकते.

पुणे : खेळपट्टीवर सामन्याचे गणित बदलू शकते का? हा प्रश्न अनेकदा चर्चीला जातो. खरोखरच खेळपट्टी इतकी महत्वाची असते का? त्याचा अभ्यास करणे खेळण्याइतकेच महत्त्वपूर्ण ठरू शकते का? क्रिकेटच्या मैदानावरील खेळपट्टी ही नैसर्गिक मातीची असते. त्यामुळे ती कोणाला साथ देईल हे छातीठोकपणे सांगता येत नसले तरी खेळपट्टीच्या अभ्यासाने सामन्यावर फरक पडू शकतो. ‘पिच बिहॅविअर’चा अभ्यास केला तर कोणत्या बाजुने कोणत्या बाजुचा बॉलर चालू शकतो, खेळपट्टी फलंदाजीला साथ देऊ शकते का? याचा अंदाज बांधणे शक्य असल्याचे ज्येष्ठ क्युरेटर (खेळपट्टी बनविणारे) प्रदीप इंगळे यांनी ‘लोकमत’शी संवाद साधताना सांगितलेभारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना पुण्यातील गहुंजे मैदानावर सुरू आहे.  सामन्याआधी पीच क्युरेटर पांडुरंग साळगावकर यांचं धक्कादायक स्टिंग आॅपरेशन समोर आल्याने क्रिकेट वतुर्ळात खळबळ उडाली. फलंदाजीसाठी चांगली खेळपट्टी तयार करण्यासाठी भर द्यावा, यासाठी पिच क्युरेटर पांडुरंग साळगावकर यांनी पैशांच्या देवाणघेवाणीचा उल्लेख केल्याचे वृत्त एका वाहिनीने दिले आहे.  खरोखरच खेळपट्टी पाहिजे तशी बनविता येते का? हा प्रश्न क्रिकेटरसिकांना पडला आहे.इंगळे म्हणतात, पिच बिहॅविअर’चा अभ्यास केला तर कोणत्या बाजूने कोणत्या बाजुचा बॉलर चालू शकतो, खेळपट्टी फलंदाजीला साथ देऊ शकते का? याचा अंदाज बांधणे शक्य आहे. क्युरेटर म्हणजे खेळपट्टी बनविणारा अत्यंत महत्त्वाचा घटक असतो. अभ्यासाने त्याला फास्ट बॉलर, स्पिनरला साथ देणारे किंवा बॅटींगसाठी उपयुक्त खेळपट्टी बनविता येऊ शकते. यासाठी पाणी मारणे, रोलर फिरविणे या गोष्टी महत्वाच्या ठरतात. पाणी किती प्रमाणात आणि कोणत्या वेळी मारायचे पाहावे लागते. संध्याकाळी पाणी मारले तर गवताच्या मुळापर्यंत पोहोचते. रोलरही १५०, २३०, ५००, ७०० किलो ते एक आणि दोन टनापर्यंत असतात. त्यांचा प्रकार आणि फिरविण्याच्या वेळा खेळपट्टी बनविण्यासाठी महत्वाच्या ठरतात.क्युरेटर म्हणजे खेळपट्टी बनविणारा अत्यंत महत्वाचा घटक असतो. अभ्यासाने त्याला फास्ट बॉलर, स्पिनरला साथ देणारे किंवा बॅटींगसाठी उपयुक्त खेळपट्टी बनविता येऊ शकते. खोदल्यानंतर विटा, डबर आणि कोळशाची पूड टाकून त्यावर वेगवेगळ्या प्रकारची माती टाकली जाते. महाराष्ट्रात नदीकाठची पोयटा माती तर उत्तर भारतात गंगेकाठची माती वापरतात. त्यामध्ये वाळूचे प्रमाण जास्त असते. त्यानंतर  पाणी मारणे, रोलर फिरविणे या गोष्टी महत्वाच्या ठरतात. पाणी किती प्रमाणात आणि कोणत्या वेळी मारायचे पाहावे लागते. संध्याकाळी पाणी मारले तर गवताच्या मुळापर्यंत पोहोचते. रोलरही १५०, २३०, ५००, ७०० किलो ते एक आणि दोन टनापर्यंत असतात. त्यांचा प्रकार आणि फिरविण्याच्या वेळा खेळपट्टी बनविण्यासाठी महत्वाच्या ठरतात. तज्ज्ञांकडून सातत्याने  याचा अभ्यास होत असतो. पिच बिहॅविअर पाहून कोणत्या बाजुने उतार आहे, कोठे तणाव आहे असा अभ्यास करून कोणत्या बाजुने कोणत्या प्रकारच्या बॉलरचा मारा करायचा हे ठरविले जाते. मात्र, हा खेळ अंगावरही येऊ शकतो. सत्तरच्या दशकात वेस्ट इंडिजची टीम भारताच्या दौर्‍यावर आली होती. वानखेडे स्टेडिअम टर्निंग ट्रॅक पध्दतीचे बनविले होते. भारताने अगोदर बॅटिंग घेतली आणि दीड दिवसांत चांगल्या धावा केल्या. टर्निंग ट्रॅकवर वेस्ट इंडिजला लवकर बाद करू असे वाटले. परंतु, दुर्दैवाने आदल्या दिवशी मुसळधार पाऊस पडला. वेस्ट इंडिजचा कर्णधार कालीचरण याने हुशारीने डाव संपल्यानंतर दोन टनी रोलर फिरविण्याची विनंती केली. मैदानात मुरलेले पाणी वर आल्याने पाटा खेळपट्टी बनली आणि वेस्ट इंडिजने तीन दिवस खेळून काढले.  एक डाव संपल्यावर कर्णधाराला अधिकार असतो की त्याने खेळपट्टीवर कोणत्या प्रकारचा रोलर फिरवायचा. पण त्यासाठी केवळ सात मिनिटे दिली जातात.  भारतासारख्या देशात खेळपट्टी दिवसात अनेक वेळा बदलते. सकाळी साडेदहा, दीड आणि साडेतीन वाजता वेगवेगळ्या प्रकारचे बाऊन्स होतात. कारण उन्हाची तीव्रता वेगवेगळी असते. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये सामना झाल्यास थंडीत पडणारे दवही खेळपट्टी बदलवू शकतात. क्युरेटरची भूमिका अत्यंत महत्वाची असली तरी त्याने बनविलेल्या खेळपट्टीबाबत कोणाला आक्षेप घेता येत नाही. परंतु, नैतिकदृष्टया त्याने खेळपट्टीविषयी कोणाशीही बोलणे गैर आहे. सामन्याच्या आदल्या दिवशी पंचांच्या देखरेखीखाली मैदान त्यांच्या ताब्यात दिले जाते. ते मार्किंग करतात. त्यानंतर कोणालाही खेळपट्टीवर जाण्याची परवानगी नसते. कोणीही तेथे बदल करू शकत नाही. 

टॅग्स :क्रिकेट