Join us  

विलियम्सन, कार्तिकचे नेतृत्व लक्षवेधी

ज्यावेळी डेव्हिड वॉर्नर यंदाच्या मोसमात संघाबाहेर राहणार असल्याचे निश्चित झाले त्यावेळी आमच्यापैकी अनेकांना संघ कमकुवत झाल्याचे वाटले.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 12:22 AM

Open in App

क्रीडा जगतात वेगवेगळी प्रतिमा निर्माण करणाऱ्या केन विलियम्सन व दिनेश कार्तिक यांनी यंदाच्या आयपीएलमध्ये आपली छाप सोडली. कोलकाता व हैदराबाद यांच्यापैकी एकाच संघाला अंतिम फेरीत धडक मारता येईल, पण या दोन्ही संघांना स्पर्धेतील शानदार कामगिरीचा सार्थ अभिमान बाळगता येईल.ज्यावेळी डेव्हिड वॉर्नर यंदाच्या मोसमात संघाबाहेर राहणार असल्याचे निश्चित झाले त्यावेळी आमच्यापैकी अनेकांना संघ कमकुवत झाल्याचे वाटले. विलियम्सनने मात्र ही एक मोठी संधी असल्याचे मानले. त्याने आव्हानाचा स्वीकार केला आणि सुरुवातीलाच उंचीवर असलेल्या आपल्या खेळाचा दर्जा अधिक उंचावला. वर्तमान खेळात शानदार खेळाडूमध्ये समावेश असलेल्या विलियम्सनने यंदाच्या आयपीएलमध्ये छाप सोडली आणि त्याने स्पर्धेत रंगत निर्माण केली. यंदाच्या मोसमात सनरायझर्सने आपल्या कामगिरीने लक्ष वेधले असेल तर त्याचे महत्त्वाचे कारण आहे विलियम्सन.जागतिक क्रिकेटमध्ये दिनेश कार्तिकची प्रतिमा विलियम्सनपेक्षा वेगळी आहे, पण केनप्रमाणे तोसुद्धा महत्त्वाकांक्षी व विनम्र व्यक्ती आहे. त्याचा हाच स्वभावगुण हेरून त्याच्याकडे कोलकाता संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आणि त्यांची ही खेळी कमालीची यशस्वी ठरली. विलियम्सनप्रमाणे त्यानेही पुढे सरसावत संघाचे नेतृत्व केले. संघ अडचणीत असताना त्याने कुठलेही दडपणन बाळगता संघाला विजयी केले आणि तेही कामगिरीत सातत्य राखून. उभय कर्णधारांपुढे आपापले आव्हान होते. सनरायझर्सला वॉर्नरविना खेळावे लागले तर अनेकदा त्यांना भुवनेश्वर कुमारची सेवाही मिळाली नाही. तरी दुसºया खेळाडूंनी जबाबदारी स्वीकारत संघाला विजयी केले. कोलकाता संघाला दुखापतीमुळे डेथ ओव्हर्समध्ये त्यांचे महत्त्वाचे अस्त्र मिशेल स्टार्कची सेवा मिळालीनाही, पण दर्जेदार संघाप्रमाणे त्यांनी विजयाचा मार्ग शोधला. पुन्हा एकदा आयपीएलने आम्हाला चांगल्या कर्णधारांचे महत्त्व पटवून दिले. विलियम्सन व कार्तिकने आपापल्या संघाचे कुशल नेतृत्वकेले. (टीसीएम)

टॅग्स :आयपीएल 2018