Join us  

सचिनवर जेव्हा 'या' छेडछाडीचा आरोप झाला होता, तेव्हा काय घडलं होतं... जाणून घ्या

भारतीय संघ 2001 साली दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेला होता. पोर्ट एलिझाबेथ येथे दुसरा कसोटी सामना सुरु होता. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी सचिनला गोलंदाजी करायला दिली होती. त्यावेळी 'हा' छेडछाडीचा आरोप त्याच्यावर झाला होता.

By प्रसाद लाड | Published: March 25, 2018 4:40 PM

Open in App
ठळक मुद्देएका कसोटी सामन्यासाठी सचिनचे निलंबन करण्यात आले.

प्रसाद लाड : क्रिकेट हा सभ्य गृहस्थांचा खेळ. काही जणांसाठी सचिन तेंडुलकर तर या खेळाचं दैवत. काही जण त्याला देव मानतात, तर काही जण त्याच्यावर कडाडाडून टीका करतात. पण सचिनने मैदानात कधीच वाईट कृत्य केलं नाही, याबाबत साऱ्यांचं एकमत असेल. पण 2001 साली सचिनवर 'या' छेडछाडीचा आरोप झाला होता, तेव्हा काय घडलं होतं... जाणून घ्या.

भारतीय संघ 2001 साली दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेला होता. पोर्ट एलिझाबेथ येथे दुसरा कसोटी सामना सुरु होता. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी सचिनला गोलंदाजी करायला दिली होती. त्यावेळी 'हा' छेडछाडीचा आरोप त्याच्यावर झाला होता. हा आरोप सचिनला मान्य नव्हता. पण तरीही सामनाधिकारी माइक डेनिस यांनी त्याच्यावर कारवाई केली. एका कसोटी सामन्यासाठी सचिनचे निलंबन करण्यात आले. बीसीसीआयला ही गोष्ट रुचली नाही. त्यांनी आयसीसीकडे याविरोधात तक्रार केली. आयसीसीने ही तक्रार योग्य नसल्याचे सांगितले. त्यावर बीसीसीआयने कडक भूमिका घेतली आणि त्यानंतरच्या कसोटी सामन्याला आंतरराष्ट्रीय स्तराचा दर्जा देता आला नाही.

काय घडले होते त्यावेळीसचिनला तिसऱ्या दिवशी गोलंदाजी देण्यात आली. सचिन मध्यमगतीने गोलंदाजी करत होता. त्यावेळी सचिनचे चेंडू चांगलेच स्विंग होत होते. त्यामुळे समालोचकांना काही तरी गैर वाटले. त्यावेळी एक स्थानिक टीव्ही. निर्माता सामन्याचे चित्रीकरण करत होता. त्याच्याकडून ते फुटेज मागवले गेले. त्या फुटेजमध्ये सचिन चेंडूच्या शिलाईबरोबर काही तरी करत असल्याचे दिसत होते. त्यामुळे डेनिस यांनी सचिनवर कारवाई केली.

सचिन तेव्हा काय म्हणाला होता...सचिनने डेनिस यांचे आरोप फेटाळले होते. याबाबत तो म्हणाला होता की, " चेंडू हा थोडासा ओला झाला होता. त्याचबरोबर काही मातीही चेंडूला चिकटली होती. त्यामुळे ही माती काढून चेंडू कोरडा करण्याचा मी प्रय्तन करत होतो. मी चेंडूशी छेडछाड करण्याचा कोणताही प्रयत्न केलेला नाही."

टॅग्स :सचिन तेंडुलकरचेंडूशी छेडछाडद. आफ्रिका