Join us  

इंग्लंडविरुद्ध वेस्ट इंडिज संकटात; इंग्लंड पहिला डाव ३६९, विंडीजची स्थिती ६ बाद १३७ धावा

इंग्लंडच्या डावात स्टुअर्ट ब्रॉड (६२), ओली पोप (९१) रोरी बर्न्स आणि जोस बटलर यांनी अर्धशतकी योगदान दिले. वेस्ट इंडिजकडून केमार रोच याने सर्वाधिक चार गडी बाद केले.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 4:29 AM

Open in App

मॅन्चेस्टर : स्टुअर्ट ब्रॉड आणि जेम्स अ‍ॅन्डरसन यांच्या प्रत्येकी दोन बळींमुळे इंग्लंडने वेस्ट इंडिजला तिसऱ्या कसोटीत चांगलेच कोंडीत पकडले आहे. इंग्लंडच्या पहिल्या डावातील ३६९ धावांना उत्तर देताना दुसºया दिवशी विंडीजने ४७.१ षटकात १३७ धावात ६ फलंदाज गमावले. हा संघ इंग्लंडच्या तुलनेत अद्याप २३२ धावांनी मागे असून ४ फलंदाज शिल्लक आहेत. अंधुक प्रकाशामुळे दिवसाचा खेळ थांबविण्यात आला तेव्हा कर्णधार जेसन होल्डर २६ आणि शेन डाऊरिच १० धावांवर खेळत होते.

इंग्लंडच्या डावात स्टुअर्ट ब्रॉड (६२), ओली पोप (९१) रोरी बर्न्स आणि जोस बटलर यांनी अर्धशतकी योगदान दिले. वेस्ट इंडिजकडून केमार रोच याने सर्वाधिक चार गडी बाद केले.यजमान संघाने कालच्या ४ बाद २५८ वरून दुसºया दिवसाचा खेळ सुरू केला. ९१ धावांवर नाबाद असलेला पोप एकही धाव न करता शॅनन गॅब्रियलच्या चेंडूवर त्रिफळाबाद झाला. कालचा दुसरा नाबाद फलंदाज जोस बटलरची (६७) दांडी गॅब्रियलनेच गूल केली. विंडीजची सुरुवातदेखील खराब झाली. क्रेग ब्रेथवेट एक धाव काढून परतला. ब्रूक्स (४) आणि रोस्टन चेस (९) अपयशी ठरले. कॅम्पबेल ३२ आणि ब्लॅकवूड २६ यांनी पडझड थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र दोघे बाद होताच पुन्हा इंग्लंडने खेळावर पकड कायम केली. (वृत्तसंस्था)जैव सुरक्षा व्यवस्थेत वास्तव्य आव्हानात्मक -पोपमॅन्चेस्टर: जैव सुरक्षा व्यवस्थेत वास्तव्य करणे आव्हानात्मक असल्याचे मत इंग्लंडचा मधल्या फळीतील फलंदाज ओली पोप याने व्यक्त केले. २२ वर्षांच्या पोपने तिसºया सामन्यात ९१ धावा केल्या. याआधी दोन्ही सामन्यात तो अपयशी ठरला होता. शॅनन गॅब्रियलच्या चेंडूवर त्रिफळाबाद होताच दुसºया कसोटी शतकास मुकलेला पोप स्काय स्पोर्ट्स क्रिकेटशी बोलताना म्हणाला,‘जैव सुरक्षा व्यवस्थेमुळे निवासाची खोली आणि मैदान इतकेच विश्व असते. कुटुंबाला देखील पाहता येत नाही. कुटुंबाला पाहू न शकल्याचा फटका मलाही बसला तथापि या कठीण समयी सहकाऱ्यांनी एकमेकांना साथ दिली.संक्षिप्त धावफलकइंग्लंड पहिला डाव: १११.५ षटकात सर्वबाद ३६९ (कालच्या ४ बाद २५८ वरून पुढे) ओली पोप ९१, जोस बटलर ६७, रोरी बर्न्स ५७, स्टुअर्ट ब्रॉड ६२. गोलंदाजी: केमार रोच ४/७२, शॅनन गॅब्रियल २/७७, रोस्टन चेस २/३६, जेसन होल्डर १/८३.वेस्ट इंडिज पहिला डाव : ४७.१ षटकात ६ बाद १३७. ब्रेथवेट १, कॅम्पबेल ३२, शाय होप १७. ब्लॅकवूड २६, होल्डर नाबाद २६, डाऊरिच नाबाद १०. गोलंदाजी: स्टुअर्ट ब्रॉड २/१७, जेम्स अ‍ॅन्डरसन २/१७, जोफ्रा आर्चर १/५५, ख्रिस वोक्स १/३९.

टॅग्स :इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज