Join us  

विंडीजचा इंग्लंडविरूद्ध मालिका विजयावर डोळा, दुसरी कसोटी आजपासून

साऊथम्पटनचा पहिला सामना विंडीजने चार गड्यांनी जिंकला. त्या सामन्यात रूट दुस-या बाळाच्या जन्मामुळे खेळू शकला नव्हता.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 12:52 AM

Open in App

मॅन्चेस्टर : कर्णधार जो रूट परतल्यामुळे फलंदाजी भक्कम होताच इंग्लंड संघ गुरुवारपासून सुरू होणाऱ्या दुसºया कसोटीत विजय मिळवून मालिका बरोबरीत आणण्याच्या निर्धाराने मैदानावर उतरेल. वेस्ट इंडिज मात्र या सामन्यात विजयासह मालिका जिंकण्याचे स्वप्न रंगवत आहे.साऊथम्पटनचा पहिला सामना विंडीजने चार गड्यांनी जिंकला. त्या सामन्यात रूट दुसºया बाळाच्या जन्मामुळे खेळू शकला नव्हता. ंइंग्लंडला २०४ धावात लोळवून विंडीजने ३१८ धावा केल्या आणि ११४ धावांची आघाडी घेतली. हीच आघाडी विजयात निर्णायक ठरली होती. कोरोनामुळे जैव सुरक्षित वातावरणात प्रेक्षकांशिवाय मालिका खेळवली जात असून पुढील दोन्ही सामने ओल्ड ट्रॅफोर्डवरच रंगतील.इंग्लंडने गेल्या दहापैकी आठ मालिकांत पहिला सामना गमावला. अलीकडे द. आफ्रिका दौºयातही पहिला सामना गमविल्यानंतर इंग्लंडने मालिका ३-१ ने जिंकली होती. दुसरीकडे ३२ वर्षांत प्रथमच येथे मालिका विजयासाठी विंडीजला फलंदाजीत ‘दम’ दाखवावा लागेल. त्यांची भिस्त क्रेग ब्रेथवेट, जॉन कॅम्पबेल, शमर ब्रूक्स, जर्मेन ब्लॅकवूड, शाय होप यांच्यावर असेल.रूटसाठी ज्यो डेन्ली याला बाहेर बसावे लागेल. रूटसह जॉन क्राऊले, ओली पोप आणि अष्टपैलू बेन स्टोक्स हे मधल्या फळीला आधार देण्यास सक्षम आहेत. या सामन्यात रूटवर थोडे दडपण असेल, अशी कबुली कोच ख्रिस सिल्व्हरवूड यांनी दिली. मागच्या सामन्यात स्टुअर्ट ब्रॉड याला बाहेर ठेवल्याने वाद उत्पन्न झाला होता. या लढतीत मात्र जेम्स अँडरसनसह नवा चेंडू हाताळण्यासाठी त्याला संधी मिळण्याची शक्यता आहे. अशावेळी मार्क वूड किंवा जोफ्रा आर्चर यांच्यापैकी एकाला बाहेर बसावे लागेल. यष्टिरक्षक-फलंदाज अपयशी ठरला तरी दुसºया सामन्यात तो खेळेल, असे संकेत मिळाले आहेत.उभय संघ यातून निवडणार : इंग्लंड : ज्यो रूट (कर्णधार), डोम सिबली, रोरी बर्न्स, जॉक क्रॉउले, बेन स्टोक्स, ओली पोप, जोस बटलर (यष्टिरक्षक), डॉम बेस, जोफ्रा आर्चर, स्टुअर्ट ब्रॉड, मार्क वूड, जेम्स अ‍ॅन्डरसन, ज्यो डेन्ली.वेस्ट इंडिज (संभाव्य एकादश) : जेसन होल्डर (कर्णधार) जॉन कॅम्पबेल, क्रेग ब्रेथवेट, शमर ब्रूक्स, शाय होप, रोस्टन चेस, जर्मेन ब्लॅकवुड, शेन डोरिच (यष्टिरक्षक), अल्जारी जोसेफ, केमार रोच, शॅनन गॅब्रियल.सामनादुपारी ३.३० पासून, थेट प्रक्षेपण : सोनी सिक्स

टॅग्स :वेस्ट इंडिज