Join us  

सचिन, धोनीला जमले नाही, पण विराटने केला हा पराक्रम

भारताचा कर्णधार विराट कोहली याची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून प्रतिष्ठेच्या पॉली उम्रीगर पुरस्कारासाठी निवड केली आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2018 3:46 PM

Open in App

मुंबई - भारताचा कर्णधार विराट कोहली याची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून प्रतिष्ठेच्या पॉली उम्रीगर पुरस्कारासाठी निवड केली आहे. बंगळुरुमध्ये 12 जून रोजी बंगळुरू येथे होणाऱ्या बीसीसीआयच्या वार्षिक पुरस्कार सोहळ्यामध्ये विराटला गौरविण्यात येईल. या पुरस्कारावर कोहलीने चौथ्यांदा नाव कोरलं आहे. यापूर्वी कोहलीने 2011-12 आणि 2013-14 आणि 2016-17 मध्येही हा पुरस्कार पटकावला आहे. चार वेळा पुरस्कारावर नाव कोरणारा विराट कोहली एकमेव खेळाडू आहे. 

महिला क्रिकेटमध्ये हरमनप्रीत कौर (2016-17) आणि स्मृति मंधाना (2017-18) यांना प्रतिष्ठेच्या पॉली उम्रीगर पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. बीसीसीआयने जगमोहन दालमिया यांच्या स्मर्णार्थ चार पुरस्कार नव्याने सुरु करण्यात आले आहेत. यामध्ये 'जगमोहन दालमिया ट्रॉफी अंडर-16' (अंडर-16 मध्ये सर्वाधिक धावा आणि विकेट घेणाऱ्या खेळाडूचा सन्मान केला जाईल) आणि विजय मर्चेंट ट्रॉफी (कनिष्ठ आणि वरिष्ठ महिला क्रिकेटरला दिला जाईल)चा समावेश असेल. 

2016-17 सत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या क्रिकेट एसोसिएशन ऑफ बंगाल (CAB) ला सर्वोत्तम राज्य संघटना म्हणून निवड झाली करण्यात आली. 2017-18 चा अवॉर्ड दिल्ली क्रिकेट असोसिएशन (DDCA) ला देण्यात आला आहे. 

टॅग्स :विराट कोहलीक्रिकेटबीसीसीआय