भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं १५ ऑगस्टला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. इतक्या वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत धोनीनं युवराज सिंग, सुरेश रैना, गौतम गंभीर, विराट कोहली आदींसह अनेक संस्मरणीय क्षण घालवले. त्यामुळेच भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेतही चाहत्यांना धोनीची आठवण येत आहे. सिडनी येथे झालेल्या दुसऱ्या टवेंटी-20 सामन्यात फॅन्स धोनी, धोनी नावाचा जयघोष देताना दिसले. त्यांचा हा जयघोष पाहून कर्णधार विराट कोहलीनंही भारी रिअॅक्शन दिली आणि तो व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
भारतीय संघानं वन डे मालिकेतील अपयशानंतर ट्वेंटी-20 मालिकेत जबरदस्त कमबॅक केले. भारतानं तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे आणि आज होणाऱ्या तिसऱ्या सामन्यात यजमानांना क्लिनस्वीप देण्याचे त्यांचे लक्ष्य आहे. दरम्यान, दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात 'We Miss You Dhoni' असे फलक घेऊन काही चाहते दिसले.
पाहा विराट कोहलीनं काय केलं...
धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १७,२६६ धावा केल्या असून त्यात १०८ अर्धशतकं आणि १६ शतकांचा समावेश आहे. २००४ ते २०२० या कालावधीत धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या तीन मानाच्या स्पर्धा जिंकल्या. ट्वेंटी-20 वर्ल्ड कप ( २००७), वन डे वर्ल्ड कप ( २०११) आणि चॅम्पियन्स ट्रॉफी या तीनही स्पर्धा जिंकणारा तो जगातला एकमेव कर्णधार आहे.