Join us  

विराट कोहली गरजेपेक्षा अधिक आक्रमक : स्टीव्ह वॉ

पण कर्णधार म्हणून त्याचा विकास होण्याचा हा एक भाग , आॅस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह वॉ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 1:09 AM

Open in App

मोनाको : दक्षिण आफ्रिका दौ-यात विराट कोहली गरजेपेक्षा अधिक आक्रमक होता, पण कर्णधार म्हणून त्याचा विकास होण्याचा हा एक भाग होता, असे आॅस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह वॉने म्हटले आहे.भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेच्या ५८ दिवसांच्या दौºयामध्ये शानदार कामगिरी केली. त्यात कसोटी मालिका १-२ ने गमावल्यानंतर एकदिवसीय व टी-२० मालिका अनुक्रमे ५-१ व २-१ ने जिंकली.लॉरेस विश्व क्रीडा पुरस्कार समारंभासाठी येथे आलेला वॉ म्हणाला,‘मी विराटला दक्षिण आफ्रिकेत खेळताना बघितले. माझ्या मते तो गरजेपेक्षा अधिक आक्रमक असल्याचे दिसत होते, पण कर्णधारासाठी ही शिकण्याची बाब आहे.’ वॉच्या मते कोहलीला समतोल साधण्याची गरज आहे. कारण संघातील सर्वच खेळाडू त्याच्याप्रमाणे स्वत:ला व्यक्त करणारे नाहीत.वॉ म्हणाला,‘कर्णधार म्हणून तो आताही विकास प्रक्रियेत आहे. आपल्या भावना नियंत्रणात राखण्यासाठी त्याला अद्याप काही वेळ मिळायला हवा, पण तो याच प्रकारे खेळतो.’ वॉ पुढे म्हणाला,‘संघातील सर्व खेळाडू अशा प्रकारे खेळू शकत नाहीत, हे त्याने समजून घ्यायलाहवे. चेतेश्वर पुजारा व अजिंक्यरहाणे यांच्यासारखे खेळाडू संयमी व शांत आहेत. त्यामुळे काही खेळाडू वेगळे असतात हे विराटने समजायला हवे. विराट सध्या संघाचे नेतृत्व चांगल्या प्रकारे करीत आहे. त्याच्यात एक्स फॅक्टर आहे. त्यामुळे संघसहकाºयांनी त्याचे अनुकरण करावे, असे त्याला वाटते. सकारात्मक खेळताना शक्य तितक्यालवकर विजय मिळवावा, असे त्याला वाटते.’वॉने सांगितले की, ‘गेल्या काही वर्षांमध्ये खेळाच्या तिन्ही प्रकारामध्ये त्याचा विजयाचा रेकॉर्ड चांगला आहे. विराटला संघाकडून मोठी अपेक्षा आहे. तो सर्वंच प्रकारात अव्वल स्थानावर राहू इच्छितो आणि वर्तमान स्थितीत ते कठीण आहे.’ कोहली व भारताची नजर आता इंग्लंड व आॅस्ट्रेलियामध्ये विजय मिळवण्यावर केंद्रित झाली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये भारतापुढे आगामी कालावधीत हे दोन मोठे आव्हानआहे. (वृत्तसंस्था)1भारतीय संघ इंग्लंडमध्ये आॅगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहेतर २०१८-१९ मध्ये आॅस्ट्रेलियामध्ये ४ कसोटी सामने खेळणार आहे.2आॅस्ट्रेलियामध्ये भारतीय संघाच्या यशासाठी कोहलीची कामगिरी निर्णायक ठरेल, असे वॉचे मत आहे.3वॉ म्हणाला, ‘आॅस्ट्रेलियात यजमान संघ प्रबळ दावेदार राहील. कारण भारताचा भारतात जसा रेकॉर्ड आहे तसाच रेकॉर्ड आॅस्ट्रेलियाचा आॅस्ट्रेलियात आहे. आॅस्ट्रेलियात कोहलीची कामगिरी महत्त्वाची ठरेल. गेल्या दौºयात त्याने शानदार कामगिरी केली होती.’

टॅग्स :विराट कोहलीक्रिकेट