Join us  

विराट कोहलीचा रडीचा डाव; ट्विटरकरांनी सुनावले खडे बोल

मुंबईच्या खेळाडूंनी अपील करूनही विराट काहीच झाले नाही, अशा अविर्भावात वावरत होता.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2018 7:56 AM

Open in App

मुंबई:  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने आपल्या घरच्या मैदानात मुंबई इंडियन्सवर 14 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्सचा कर्णधार विराट कोहलीने 32 धावांची खेळी केली. मात्र, 24 धावांवर असताना विराटला एक जीवनदान मिळाले होते. त्यावेळी कोहलीने दाखविलेली अखिलाडू वृत्ती सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर अनेक क्रिकेटप्रेमींनी विराटला धारेवर धरले. सामन्यातील 14व्या षटकात हा प्रसंग घडला. यावेळी जसप्रीत बुमराहने टाकलेला चेंडू विराट कोहलीच्या बॅटची कड घेऊन गेला. त्यावर मुंबईच्या खेळाडूंनी अपीलही केले. मात्र, पंचांनी विराटला नाबाद ठरवले. यानंतर रिप्लेमध्ये चेंडू विराटच्या बॅटला लागल्याचे स्पष्टपणे दिसत होते. साहजिक विराटला या गोष्टीची जाणीव असावी. मात्र, मुंबईच्या खेळाडूंनी अपील करूनही विराट काहीच झाले नाही, अशा अविर्भावात वावरत होता. त्यामुळे अनेकजण विराटच्या या अखिलाडू वृत्तीवर टीका करत आहेत. विराट कोहली म्हणजे भावी सचिन तेंडुलकर आहे, अशी चर्चा अनेकदा होते. मात्र, बाद झाल्यानंतर सचिन पंचांच्या निर्णयाची वाट न पाहता मैदान सोडायचा, याची आठवण अनेकांनी करून दिली. 

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने आपल्या घरच्या मैदानात मुंबई इंडियन्सवर 14 धावांनी विजय मिळवला. बंगळुरुने प्रथम फलंदाजी करताना 167 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईने बिनीचे तीन फलंदाज फक्त 21 धावांत गमावले. त्यानंतर हार्दिक पंड्याने (50) अर्धशतक झळकावत मुंबईला विजयाची आशा दाखवली होती. पण अखेरच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर हार्दिक बाद झाला आणि मुंबईच्या विजयाच्या आशा मावळल्या. बंगळुरुकडून टीम साऊथी, उमेश यादव आणि मोहम्मद सिराज या वेगवान गोलंदाजांनी प्रत्येकी दोन बळी मिळवत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

टॅग्स :आयपीएल 2018विराट कोहली