Join us  

विदर्भाची जेतेपदाच्या दिशेने कूच, पहिल्या डावात ७ बाद ५२८ धावांची मजल, अक्षय वाडकरचा दिल्लीकरांना शतकी तडाखा

अक्षय वाडकरने कारकिर्दीतील झळकावलेल्या पहिल्या शतकाच्या जोरावर विदर्भाने अंतिम लढतीत तिस-या दिवशी दिल्लीविरुद्ध पहिल्या डावात २३३ धावांची भक्कम आघाडी घेत पहिल्या रणजी ट्रॉफी जेतेपदाच्या दिशेने कूच केली.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2018 3:32 AM

Open in App

- नीलेश देशपांडेइंदूर :आपल्या पहिल्या मोसमात पाचव्या सामन्यात खेळणारा यष्टिरक्षक वाडकर १३३ धावा काढून नाबाद आहे. विदर्भाने दिवसअखेर पहिल्या डावात ७ बाद ५२८ धावांची दमदार मजल मारली. सिद्धेश नेरळ ९२ चेंडूंना सामोरा जाताना ५६ धावा काढून वाडकरला साथ देत आहे. त्याने अर्धशतकी खेळीत चार षटकार व चार चौकार लगावले. वाडकर व नेरळ यांनी आठव्या विकेटसाठी आतापर्यंत ११३ धावांची अभेद्य भागीदारी केली आहे. दिल्लीचा पहिला डाव २९५ धावांत संपुष्टात आला. वाडकरने त्याआधी होळकर स्टेडियममध्ये आदित्य सरवटेसोबत सातव्या विकेटसाठी १६९ धावांची भागीदारी केली. सवरटेने १५४ चेंडूंना सामोरे जाताना ७९ धावा केल्या.विदर्भाने कालच्या ४ बाद २०६ धावसंख्येवरून पुढे खेळताना आज निर्धाराने फलंदाजी केली. विदर्भाने दिल्लीच्या सुमार क्षेत्ररक्षणाचा लाभ घेतला. दिल्लीने अनुभवी वसीम जाफरला आज सुरुवातीलाच जीवदान दिले. त्याने ७८ धावांची खेळी केली. दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतकडे विदर्भाच्या फलंदाजांना रोखण्याची कुठली रणनीती नव्हती. त्याने यष्टिचितची संधीही गमावली.कुणाल चंदेलाने दिवसाच्या पहिल्याच षटकात नवदीप सैनीच्या चौथ्या चेंडूवर जाफरचा झेल सोडला. जाफर त्यानंतर वैयक्तिक धावसंख्येत केवळ १७ धावांची भर घालत तंबूत परतला. पण, तो जवळजवळ दीड तास खेळपट्टीवर होता. त्यामुळे भेदक मारा करणारा सैनी थकला होता. त्याने १०.५ षटकांचा मोठा स्पेल करताना दोन बळी घेतले.जाफर बाद झाल्यानंतर सैनी थकलेला होता. त्यामुळे त्याला विदर्भाच्या तळाच्या फलंदाजांना अधिक गोलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही. त्याच्या स्थानी दुसरा गोलंदाज आल्यानंतर वाडकर व सरवटे यांना तळ ठोकण्याची संधी मिळाली. दोघांनी विदर्भाला मजबूत स्थितीत आणले. वाडकरने १६ चौकार लगावले व एक षटकार मारला.फिरकी गोलंदाजाची दिल्ली संघाला उणीव भासली. त्यामुळे अनुकूल स्थिती नसतानाही सैनी व कुलवंत खेजरोलिया या वेगवान गोलंदाजांना मारा करावा लागला. आकाश सुदनला छाप सोडता आली नाही. मनन शर्मा प्रदीर्घ वेळ मैदानाबाहेर असल्यामुळे दिल्ली संघाच्या फिरकी गोलंदाजीच्या बाजूवर मर्यादा आल्या. अनुभवी गौतम गंभीर बोटाला झालेल्या दुखापतीमुळे उपाहारानंतर क्षेत्ररक्षणासाठी आला नाही. त्याने विकास मिश्राच्या गोलंदाजीवर सरवटेचा झेलही सोडला. वाडकरने मिड आॅनच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरुन चौकार ठोकत शतक पूर्ण केले. यावेळी स्टेडियममध्ये उपस्थित त्याच्या कुटुंबियांनी त्याचे मनोधैर्य उंचावले. नेरळला आज नशिबाची साथ लाभली. खेजरोलियाच्या गोलंदाजीवर तो दोनदा बाद झाला, पण दोन्ही वेळा नोबॉल पडल्याने त्याला जीवदान मिळाले.

दिल्ली संघ अडचणीतइंदूर : गौतम गंभीर, नवदीप सैनी व मनन शर्मा यांच्यासारखे खेळाडू दुखापतग्रस्त झाल्यामुळे विदर्भाविरुद्ध खेळल्या जात असलेल्या रणजी ट्रॉफी अंतिम लढतीत दिल्ली संघाच्या अडचणींमध्ये भर पडली आहे.प्रशिक्षक के.पी. भास्कर यांच्या मते डावखुरा फिरकीपटू मननच्या गुडघ्याला दुखापत झाली असून तो आता या लढतीत खेळणार नाही. तिसºया दिवसाचा खेळ संपल्यानतंर मननच्या गुडघ्यावर पट्टी बांधलेली दिली. मननला शनिवारी विदर्भाच्या डावाच्या सुरुवातीला सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली होती.रविवारी उपाहारानंतर गंभीरच्या अंगठ्याला दुखापत झाली तर सैनीला स्नायूच्या दुखापतीने सतावले. मनन उर्वरित लढतीत खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे तर सोमवारी चौथ्या दिवशी गंभीर व सैनी मैदानात उतरतील.सामन्याच्या तिसºया दिवशी विदर्भाच्या फलंदाजांनी मैदानावर दिल्लीच्या क्षेत्ररक्षकांना दमवले. अक्षय वाडकरने कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. त्याने आपल्या पहिल्या रणजी सत्रातील पाचव्या सामन्यात नाबाद १३३ धावांची खेळी केली. वाडकरच्या शतकी खेळीच्या जोरावर विदर्भाने दिवसअखेर पहिल्या डावात ७ बाद ५२८ धावांची मजल मारली. विदर्भाकडे एकूण २३३ धावांची आघाडी आहे. दिल्लीचा पहिला डाव २९५ धावांत संपुष्टात आला. वाडकर म्हणाला, ‘पहिल्या तीन लढतींमध्ये संघात समावेश नव्हता, पण स्थानिक सामन्यांत चांगली कामगिरी केल्यामुळे संधी मिळाली.’संधी साधायची होतीस्पर्धेतील पहिल्या तीन सामन्यांमध्ये मला संधी मिळाली नव्हती. त्यामुळे काहीसा निराश होतो. त्याचवेळी, स्थानिक सामन्यांत चांगली खेळी केल्याने रणजी संघामध्ये संधी मिळाली. त्यामुळे मिळालेली संधी साधण्याचे लक्ष्य होते, असे शतकवीर वाडकर म्हणाला.धावफलकदिल्ली पहिला डाव सर्वबाद २९५. विदर्भ पहिला डाव (कालच्या ४ बाद २०६ धावसंख्येवरुन पुढे) :- वसीम जाफर पायचित गो. एन. सैनी ७८, अक्षय वखरे झे. पंत गो. सैनी १७, अक्षय वाडकर खेळत आहे १३३, आदित्य सरवटे झे. पंत गो. राणा ७९, सिद्धेश नेरळ खेळत आहे ५६. अवांतर (२७). एकूण १५६ षटकांत ७ बाद ५२८. बाद क्रम : १-९६, २-१०७, ३-१३३, ४-२०६, ५-२३७, ६-२४६, ७-४१५. गोलंदाजी : आकाश सुदन २७-३-२०२-२, एन. सैनी ३२.५-४-१२६-३, नितीश राणा १३.१-१-३२-१, खेजरोलिया ३५-५-१२२-१, व्ही. मिश्रा ३८-६-१०२-०, ध्रुव शोरे १०-१-२७-०.

टॅग्स :क्रिकेटरणजी चषक 2017