Join us  

अंडर 19 आशिया चषक भारतात नको - पाक

सुरक्षेच्या कारणास्तव भारतात होणारा 19 वर्षाखालील आशिया चषक तटस्थ ठिकाणी खेळवण्यात यावा अशी मागणी पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं केली आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2017 4:46 PM

Open in App

नवी दिल्ली, दि. 08 - सुरक्षेच्या कारणास्तव भारतात होणारा 19 वर्षाखालील आशिया चषक तटस्थ ठिकाणी खेळवण्यात यावा अशी मागणी पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं केली आहे. आज दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही मागणी केली आहे. दक्षिण आशियाई देशांमधील सुरक्षाच्या कारणामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं ही मागणी केल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. नोव्हेंबर 2017 मध्ये होणाऱ्या 19 वर्षाखालील आशिया चषक क्रिकेट स्पर्धेचा भारत आयोजक आहे.पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजम सेठी म्हणाले की, शनिवारी आशियन क्रिकेट काऊन्सिलच्या कोलंबोमध्ये झालेल्या बैठकीत  19 वर्षाखालील आशिया चषकाच्या आयोजनावर चर्चा झाली आहे. या चर्चेमध्ये सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचेही ते म्हणाले.  दोन्ही देशातील राजकीय परिस्थितीमुळे तणावग्रस्त वातावरण निर्माण झालेलं आहे. त्यामुळे 2007 पासून भारत-पाकिस्तान यांच्या दरम्यान द्विपक्षीय मालिका खेळण्यास प्रतिबंध केला गेला आहे. 2012-13 मध्ये पाकिस्तान भारत दौऱ्यावर गेला होता. त्यावेळी या दौऱ्यात 3 वन डे आणि 2 ट्वेण्टी-20 सामने खेळले होते. भारताने वन डे मालिका 2-1 ने गमावली होती. तर टी-20 मालिका अनिर्णित राहिली होती. आयसीसीच्या स्पर्धेशिवाय भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये कोणताही सामना होत नाही. 2013 मध्ये भारताने महिला विश्वचषकाचं आयोजन केलं होतं. त्यावेळी सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानचा मुंबईत होणारा सामना कटकमध्ये हलवण्यात आला होता.

दोन्ही देशातील राजकीय परिस्थिती सुधारत नाही तोपर्यंत पाकिस्तान भारतात सामने खेळण्याचा विचार करत नाही. त्याचप्रमाणे आतापर्यंत दोन्ही देशांमद्ये सुरक्षेच्या कारणास्तव अनेक मालिका रद्द करण्यात आल्या आहेत. 2014 ते 2023 पर्यंतच्या भारत पाकिस्तानच्या वरिष्ठ संघाच्या सहा मालिका बाकी आहेत.   

टॅग्स :पाकिस्तान